‘माझं घर माझा संसार’ चित्रपटातील अजिंक्य देवची ही गोड अभिनेत्री आठवतेय का?, एकाच फिल्मनंतर झाली होती सिनेसृष्टीतून गायब

‘माझं घर माझा संसार’ चित्रपटातील अजिंक्य देवची ही गोड अभिनेत्री आठवतेय का?, एकाच फिल्मनंतर झाली होती सिनेसृष्टीतून गायब

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत की, ज्यांनी अल्पावधीतच यश मिळवले. काही जणींनी तर एकच चित्रपट आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीतून त्या गायब झाल्या. तर काही अभिनेत्रीचे अतिशय अल्प वयात निधन झाल्याचे आपण पाहिले असेल.

यामध्ये आपल्याला प्राधान्याने अभिनेत्री स्मिता पाटील यांचे नाव घेता येईल. स्मिता पाटील या दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटला होता. मात्र, त्यांचे निधन अतिशय लहान वयात झाले होते. याचबरोबर आपल्याला रंजना यांचे नाव देखील आपल्याला नाव घेता येईल.

रंजना आणि अशोक सराफ यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अशोक सराफ यांनी त्यांच्या सोबत लग्न देखील केले होते, असे सांगण्यात येते. मात्र, त्या आजारी पडल्या आणि अशोक सराफ यांनी त्यांची साथ सोडली. त्यानंतर रंजना यांचे निधन झाले. त्यानंतर अशोक सराफ यांनी निवेदिता सराफ जोशी यांच्यासोबत लग्न केले होते.

मराठीमध्ये असे काही चित्रपट झाले आहेत की, ते न विसरता येण्या जोगे आहेत. यामध्ये आपल्याला अनेक चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. “अशी ही बनवा बनवी” हा चित्रपट आजही प्रेक्षक तेवढ्याच आवडीने पाहत असतात. या चित्रपटातील सर्वच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या.

यामध्ये अशोक सराफ, निवेदिता जोशी सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, सिद्धार्थ यांच्यासारख्या अभिनेत्याच्या भूमिका होत्या. त्याच बरोबर सुधीर जोशी यांनी देखील या चित्रपटांमध्ये लक्षवेधी असे काम केले होते. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की तिने आपल्या करिअर मध्ये एकच चित्रपट आपल्या करिअरमध्ये केला होता हा चित्रपट तिचा तुफान गाजला होता.

त्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला होता. या अभिनेत्रीचे नाव मुग्धा चिटणीस होते. मुग्धा चिटणीस यांनी ‘माझं घर माझा संसार’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट एवढा गाजला होता की, प्रेक्षकांनी तो अनेकदा पहिला. या चित्रपटातील रेल्वेमध्ये चित्रीत करण्यात आलेले “दृष्ट लागण्याजोगे सारे” हे गाणे प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत.

या गाण्यामध्ये मुग्धा चिटणीस यांच्यासोबत अभिनेता अजिंक्य देव दिसला होता. रेल्वेमध्ये गायलेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. मात्र, दुर्दैवाने मुग्धा चिटणीस यांना हा चित्रपट केल्यानंतर कॅन्सरचा आजार डिटेक्ट झाला. 1994 मध्ये त्यांनी या आजारावर उपचार सुरू केले. मात्र दुर्दैवाने 1996 मध्ये त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पतीचे नाव उमेश घोडके असे होते. मुग्धा चिटणीस यांनी कथानक यामध्ये देखील 500 प्रयोग जवळपास केले आहेत. त्यांच्या नावावर हा विक्रमच म्हणावा लागेल. ज्यावेळेस मुग्धा यांचे निधन झाले, त्यावेळेस त्यांची मुलगी ईशा ही खूप लहान होती. त्यामुळे उमेश घोडके यांनी यांनी तिचा काही वर्षे सांभाळ केला.

त्यानंतर तिला आपल्या आजी-आजोबांकडे पाठवले. त्यानंतर दिशा ही चांगली शिकली. आता ती अमेरिकेमध्ये राहत आहे. कायदे विभागामध्ये तिने पदवी देखील घेतलेली आहे. त्याचप्रमाणे जर्मन भाषेमध्ये तिने पदवी घेतली.

तसेच पत्रकारितेमध्ये न्यूयार्क विद्यापीठातून तिने डिग्री घेतली आहे. मुग्धा चिटणीस यांच्या निधनानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. दृष्ट लागण्या जोगे सारे या गाण्यांमधून त्या कायम आपल्या जवळच असतील.

Team Hou De Viral