‘लहान तोंडी मोठा घास’, आर्या आंबेकर ‘त्या’ पोस्टमुळे पुन्हा चर्चेत

‘लहान तोंडी मोठा घास’, आर्या आंबेकर ‘त्या’ पोस्टमुळे पुन्हा चर्चेत

मराठी चित्रपटामध्ये सध्या अनेक कलाकार निर्माण झाले आहेत. यामध्ये गायक व गायिका देखील खूप मोठ्या प्रमाणात आता आलेले आहेत. मराठमोळी अशीच एक गायिका आहे. तिचे नाव आर्या आंबेकर असे आहे. आर्या आंबेकर ही एका पोस्टमुळे नुकतीच चर्चेत आली आहे. अनेकांनी या पोस्टवर तिचे कौतुक देखील केले आहे.

तिने अशी काय पोस्ट टाकली याबद्दल आम्ही आपल्याला या लेखांमध्ये माहिती देणार आहोत, आर्या आंबेकर हिने सा रे ग म प लिटल चॅम्प्स मधून मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. आर्या आंबेकर हिने या शोमध्ये असा काही धमाकेदार परफॉर्मन्स केला होता की, तिने पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर याच शोचे सूत्रसंचालन देखील करत असते.

आर्या आंबेकरने तिचा सहकलाकार रोहित राऊत याने काही महिन्यांपूर्वी जुईली जोगळेकर या गायिकेसोबत लग्न केले आहे. या दोघांनी लग्नाच्या वेळेस आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर आर्या आंबेकर हिने देखील रोहित याला शुभेच्छा देताना अनेक आठवणी सांगितल्या होत्या. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करते. तिच्या या फोटोला अनेक जण लाईक देखील करत असतात. आर्या आंबेकर हिचा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा फॅन फॉलोवर आहे. अलिकडे ऊठसूट अनेक जण सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतात. काहीही कारण नसताना ते फोटो टाकतात.

त्यामागचे गणित हे आर्थिक असते, हे अनेकांना माहितीच नाही.फेसबुक किंवा सोशल मीडियावर तुमचे सर्वाधिक फ्रेंड फॉलोअर असतील तर तुम्हाला सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात पैसे देखील देत असतो. मग सेलिब्रिटी देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतात आणि लाखो रुपये या माध्यमातून कमाई करत असतात.

आता आर्या आंबेकर हिने देखील नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपला एक जबरदस्त व्हिडिओ टाकला आहे. आर्या आंबेकर हिने आपला योगा करताना चा एक फोटो अपलोड केला आहे. त्यामध्ये ती हाफ पॅन्ट आणि बनियान वर दिसत आहे. आर्या आंबेकर हिने या व्हिडिओमध्ये एक चॅलेंज स्वीकारले, असे दिसत आहे.

या व्हिडिओ मध्ये ती योगा प्रकार करताना दिसत आहे. पहिला प्रयोग यशस्वी होतो. मात्र तिने केलेला हा प्रयत्न अनेकांना आवडला आहे. त्यामुळे नेटकर्यायांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. being a beginner at working out this is असे तिने कॅप्शन देत लहान तोंडी मोठा घास, असे म्हटले आहे.

तसेच अनेकांनी हा योगा प्रकार करताना तिला काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. तिच्या फोटोवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी देखील कमेंट केल्या आहेत.

Team Hou De Viral