लक्ष्याच्या लेकीने लावलाय नेटकऱ्यांना ‘वेड’, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झालेत ‘घायाळ’

लक्ष्याच्या लेकीने लावलाय नेटकऱ्यांना ‘वेड’, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झालेत ‘घायाळ’

आपल्या वैविध्यपूर्ण अभिनय आणि विनोदी टायमिंगने सर्वांनाच खळखळून हसवणारा लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसला तरी त्याचा अभिनय आणि तो आपल्या सोबतच असल्याचे अनेकांना जाणवत असते. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे एक खळखळणारा हसवणारा झरा आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केले होते. त्यांनी काम केलेली खूप चित्रपट देखील गाजले. मात्र, त्याचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवा बनवी’ हा म्हणावा लागेल. हा चित्रपट जवळपास पंचवीस वर्षांनंतर आजही तेवढाच पाहिला जातो. या चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग तसूभरही कमी झाला नाही.

या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती. या चित्रपटातील अशोक सराफ, सचिन यांच्या देखील भूमिका खूप गाजल्या होत्या. सचिन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित आणि प्रदर्शित केला होता. या चित्रपटात अशोक सराफ यांची भूमिकाही विशेष करून गाजली होती. लक्ष्मी कांत बेर्डे यांचे महेश कोठारे यांच्या सोबतही चित्रपट हे प्रचंड गाजले होते.

झपाटलेला हा चित्रपट त्यांचा प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग देखील आला होता. मात्र, या चित्रपटाचा दुसरा भाग यामध्ये आजारी होते. असे असताना देखील त्यांनी हा चित्रपट पूर्णत्वास नेला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीसाठी आजारमर असेच आहे. त्यांनी हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या होत्या. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात देखील त्यांनी केलेली भूमिका गाजली होती. हा चित्रपट प्रचंड चालला होता. तसेच ‘हम आपके हे कोण’ हा चित्रपट देखील त्यांचा खूप चालला होता. या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती.

आता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पश्चात त्यांचे मुलं देखील मराठी चित्रपट सृष्टी मध्ये येण्यासाठी सज्ज आहेत. यातील त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा तर आधीच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये रुळला आहे, तर त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डे ही देखील मराठी चित्रपट सृष्टी मध्ये येण्यास सज्ज आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे या देखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी देखील अनेक चित्रपटात काम केले आहे.

लक्ष्मीकांत यांच्या पश्चात प्रिया बेर्डे यांनी आपल्या मुलांचा सांभाळ देखील अतिशय योग्य पद्धतीने केला आहे. आता स्वानंदी बेर्डे ही सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमी संपर्कात असते. आपले अनेक फोटो ती शेअर करत असते. आता तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये ती साडी मध्ये दिसत आहे. गुलाबी रंगाची घातलेली तिची ही साडी अतिशय जबरदस्त अशी आहे. साडी मध्ये तिचे रूप हे खूपच खुलले आहे. एकूणच स्वानंदी आता लवकरच चित्रपटसृष्टीमध्ये दिसणार असे संकेत मिळत आहेत.

Team Hou De Viral