या दिग्गज लाडक्या विनोद वीराच्या मुलीचा झाला विवाह; मुलगीही आहे कलाकार

या दिग्गज लाडक्या विनोद वीराच्या मुलीचा झाला विवाह; मुलगीही आहे कलाकार

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये विवाह सोहळ्याचा धूम धडाका सुरू आहे. अनेक कलाकार आता विवाहबंधनात अडकणार आहेत. तर काही जणांची लग्न देखील झालेली आहेत. यामध्ये आपल्याला सोनाली कुलकर्णी हिचे नाव घेता येईल.

सोनाली कुलकर्णी हिने काही दिवसांपूर्वीच लग्न केले आहे. त्याप्रमाणे मानसी नाईक हिने देखील लग्न केले आहे. तर अनेक कलाकारांप्रमाणे राजकारण्यांच्या मुलींचे देखील विवाह सोहळा सध्या जोरात सुरू आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्या मुलीचा विवाह नुकताच मुंबईमध्ये थाटामाटात पार पडलेला आहे.

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुलीचा विवाह देखील पुण्यात पार पडला, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या देखील मुलीचा विवाह अगदी थाटामाटात पार पडला. तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार आहेत. त्यांच्या मुलांचादेखील विवाह सोहळा पार पडलेला दिसत आहे.

ज्येष्ठ विनोदवीर व अभिनेते अरुण कदम यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्यांच्या मुलीने सागर पोवळे याच्या सोबत लग्न केले. अरुण कदम यांनी याबाबचे फोटो सोशल मीडिया नुकतेच शेअर केले आहेत. अरुण कदम सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून घराघरात पोहोचलेले आहेत.

अरुण कदम यांनी आजवर अनेक चित्रपट व मालिकामध्ये देखील काम केले आहे. अरुण कदम यांनी जुन्या काळात काही चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांना अनेक मालिका देखील मिळालेल्या आहेत. अरुण कदम सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये काम करत असतात. त्यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 मध्ये झालेला आहे.

अरुण कदम यांच्या बाबतीत चा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झालेला‌ होता. यामध्ये ते आपल्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये सहभागी झाल्याचे दिसत होते. होय अरुण कदम यांना एक मुलगी आहे. तिचे नाव सुकन्या असे आहे. तिचा साखरपुडा नुकताच पार पडलेला होता. सुकन्याचे लग्न सागर पोवळे याच्यासोबत नुकतेच करण्यात आले.

नोंदणी पद्धतीने हा विवाह करण्यात आला. या विवाहाला मराठीतील काही कलाकार उपस्थित होते. अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा झाला. सुकन्या हीदेखील ग्राफिक डिझायनर आणि कलाकार आहे. तिने भरतनाट्यम मध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वी अरुण कदम यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यामध्ये मुलगी जावई आणि यांच्यासोबत ती दिसत आहे. अरुण कदम यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केलेले आहे. तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्ये ते लोकप्रिय ठरलेले आहेत.

Ambadas