‘TRP’ च्या बाबतीत ही मराठी मालिका ठरली अव्वल, ‘बिगबॉस मराठी’ तर डायरेक्ट…

‘TRP’ च्या बाबतीत ही मराठी मालिका ठरली अव्वल, ‘बिगबॉस मराठी’ तर डायरेक्ट…

छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या मालिका धूमधडाक्यत सुरू आहेत. मात्र या मालिकांचे मूल्यमापन हे खऱ्या अर्थाने टीआरपीच्या रेटिंग नुसारच करण्यात येते. टीआरपी काढण्याची एक वेगळी पद्धत असते. जी मालिका सगळ्यात जास्त घरांमध्ये पहिल्या जाते, तिचे मूल्यमापन एका ठिकाणी होत असते.

त्यानुसार हा टीआरपी काढण्यात येतो. त्यानुसार या मालिकेचा टीआरपी हा घसरतो. त्या या बंद करण्यात येतात. टीआरपी याचा अर्थ सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या मालिका. काही महिन्यापूर्वी स्वामिनी ही मालिका सुरू होती. मात्र, स्वामिनी मालिकेचा टीआरपी हा अचानक घसरला. त्यामुळे ही मालिका बंद करावी लागली.

याचप्रमाणे इतर अशा काही मालिका आहेत त्या देखील अशाच बंद कराव्या लागल्या. आज आम्ही आपल्याला अशाच टॉप फाइव्ह मालिका बद्दल माहिती देणार आहोत.ज्या आज सर्वाधिक पाहिल्या जातात. यावर एक नंबर वर कुठली मालिका आहे ते देखील आम्ही आपल्याला सांगू. यात नुकतीच सुरू झालेला बिग बॉस मराठी तीन हा शो शेवटचा स्थानाला घसरला आहे.

5) फुलाला सुगंध मातीचा फुलाला – सुगंध मातीचा ही मालिका काही दिवसापूर्वी लोकप्रिय होती. मात्र , टीआरपी च्या बाबतीत ही मालिका घसरली आहे. शुभम आणि कीर्ती यांची प्रेम कहानी यात दाखवण्यात आलेली आहे. येणाऱ्या काही दिवसात ही मालिका आणखी टॉप वर जाईल, असा विश्वास या मालिकेतील कलाकार आणि निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

4) माझी तुझी रेशीमगाठ – झी मराठीवर ही मालिका नुकतीच सुरू झाली. या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे हे कलाकार आहेत. या प्रमाणे या मालिकेत संकर्षण कराडे हादेखील दिसत आहे.मायरा ही भूमिकादेखील प्रेक्षकांनी आता आवडत आहे, असे असले तरी ही मालिका प्रेक्षकांच्या मनातुन काहीशी उतरलेली आहे. ती चौथ्या स्थानावर आहे.

3) रंग माझा वेगळा – ही मालिका देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. आता या मालिकेमध्ये वेगवेगळे टिस्ट येताना दिसत आहेत. काही आठवड्यांपूर्वी या मालिकेचा टीआरपी वाढला होता. ही मालिका तिसऱ्या स्थानावर आली आहे.

2) आई कुठे काय करते – आई कुठे काय करते ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून आहे. या मालिकेमध्ये अनिरुद्ध, अरुंधती, संजना या ट्रँगल बाबत सर्व काही दाखवण्यात आले आहे. आणखीन काही दिवस ही मालिका सुरू राहील, असा अंदाज आहे. या मालिकेने आपले स्थान कायम राखत दुसऱ्या स्थानावर आपली एंट्री ठेवली आहे.

1) सुख म्हणजे नक्की काय असतं – स्टार प्रवाह वर सुरू असलेली सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका दिवसेंदिवस गाजत असल्याचे दिसत आहेत. ही मालिका आता पहिल्या स्थानावर आलेली आहे. जयदीप आणि गौरी यांची प्रेम कहानी प्रेक्षकांना चांगलीच रुजत आहे. त्याचप्रमाणे शालिनी ची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे.

Team Hou De Viral