जुईली जोगळेकरच्या घराची झालीय ‘बेक्कार’ अवस्था, VIDEO पाहून बसेल धक्का

जुईली जोगळेकरच्या घराची झालीय ‘बेक्कार’ अवस्था, VIDEO पाहून बसेल धक्का

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत ही जोडी कायमच चर्चेत असते. ही जोडी सोशल मीडियावर आपले अनेक फोटो देखील शेअर करत असते. या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे. या दोघांच्या लग्नाला बॉलिवूडमधील काही कलाकारांसह मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे या लग्नाला आर्या आंबेकर ही हजर राहू शकली नाही आर्या आंबेकर आणि रोहित राऊत हे अतिशय चांगले मित्र आहेत. त्यामुळे आर्या हिने याबाबत खंत देखील बोलून दाखवत रोहित याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत यांची भेट काही वर्षांपूर्वी सा रे ग म प लिटल चॅम्पच्या सेटवर झाल्याचे सांगण्यात येते.

रोहित राऊत त्यावेळेस लहान होता आणि लिटल च्या मध्ये तो गाणी म्हणायचा. हळूहळू रोहित राऊतने हा प्रवास पुढे नेला. सारेगमप केल्यानंतर त्याने हिंदी मध्ये देखील आपले नशीब आजमावले. इंडियन आयडल हा शो करून रोहित राऊत याने सर्वांची वाहवा मिळवली. रोहित राऊत याने इंडियन आयडलचा किताब जिंकला नसला तरी त्याने आपल्या गाण्याने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले.

बप्पीदा यांचे की पग घुंगरू हे गाणे त्यांच्यासमोरच गाताना बप्पीदा यांनादेखील गहिवरून आले होते. बप्पी लहरी यांनी देखील रोहित याला शाबासकी दिली होती. ऑडिशनच्या पहिल्याच दिवशी रोहित राऊत याने दिल से रे हे गाणे अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडले होते. त्यावेळेस अनु मलिक, विशाल ददलानी, नेहा कक्कर यांचेदेखील होश उडाले होते.

रोहित राऊतने जुईली जोगळेकरच्यासोबत लग्न केले आहे. हे दोघे देखील संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत. त्या दोघांनी अनेक गाणे देखील एकत्र गायलेली आहेत. आता भविष्यात देखील हे दोघे एकत्र काम करणार असल्याचे सांगण्यात येते.जुईली जोगळेकर ही देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले अनेक अपडेट देत असते.

तसेच आपले वेगवेगळे फोटो देखील शेअर करत असते आणि व्हिडिओ देखील शेअर करत असते. जुईलीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या घराची अवस्था अतिशय बेकार झाल्याचे दिसत आहे. कारण की तिच्या घरामध्ये सगळीकडे पसाराच पसारा दिसत आहे आणि घरामध्ये कापूस झाल्याचे दिसत आहे.

जुईलीच्या घरात असलेल्या श्वानांनी उशी आणि इतर गोष्टी फोडल्याने घरामध्ये कचरा कचरा झाला आहे. जुईली जोगळेकरने हा व्हिडिओ शेअर करत शहाणं बाळसं कॅप्शन दिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या व्हिडिओ वर कमेंट देखील केल्या आहेत.

अभिनेता यशोमन आपटेने कमेंट करत ‘वाह क्या बात है’ अशी कमेंट केली आहे. तर एका युजरने अशी कमेंट केली आहे की ‘कुणाचं बाळ आहे इतकं शहाणा’ असं म्हटलं आहे, तर एकाने ‘व्हिस्की नाम सुनके थंडा समजा क्या फायर है मै’ अशी कमेंट केली आहे. जुईलीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतांना दिसत आहेत.

Team Hou De Viral