‘निलेश साबळे’ सोबत दिसणाऱ्या ‘या’ गोंडस मुलीला ओळखले का? ‘अबोली’ मालिकेचे साकारत आहे महत्त्वाची भूमिका

‘निलेश साबळे’ सोबत दिसणाऱ्या ‘या’ गोंडस मुलीला ओळखले का? ‘अबोली’ मालिकेचे साकारत आहे महत्त्वाची भूमिका

चला हवा येऊ द्या ( Chala Hawa Yeu dya ) या शोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे डॉक्टर निलेश साबळे होय. निलेश साबळे याने आजवर चला हवा येऊ द्या या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. नीलेश साबळे अतिशय चतुरस्त अभिनेता आहे.

आपल्या खुमासदार विनोदाने तो सगळ्यांचेच मनोरंजन करत असतो. आज आम्ही आपल्याला निलेश साबळे सोबत दिसणाऱ्या एका गोंडस मुली बद्दल माहिती देणार आहोत. ही मुलगी आज एक दिग्गज अभिनेत्री आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ती मुलगी.

नीलेश साबळे याचा जन्म 30 जून 1986 रोजी झाला असून त्याचे वय सध्या 36 वर्ष आहे. त्याचा जन्म कोल्हापूर येथे झाला आहे. नीलेश साबळे याने लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्रांमध्ये करियर करायचे ठरले होते. त्यानुसार तो या क्षेत्रामध्ये चांगला रमला देखील आहे. नीलेश साबळे याने चला हवा येऊ द्या या शोमध्ये आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने तसेच आपल्या अभिनयाने सर्वांचेच मने जिंकून घेतली आहेत.

आज नीलेश साबळे याला खूप मागणी देखील आहे. नीलेश साबळे याचे शो होण्यासाठी अनेक जण प्रयत्न देखील करत असतात. निलेश साबळे याने चला हवा येऊ द्या याच्यासोबतच फु बाई फु, लाव रे तो व्हिडिओ यासारखे प्रसिद्ध शो देखील केले आहेत.नीलेश साबळे याने वैद्यकीय क्षेत्रात देखील नाव कमावले आहे.

नीलेश हा आयुर्वेदिक डॉक्टर असून त्यांनी एम एस पदवी देखील मिळवली आहे. झी मराठीवरील रियालिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार जिंकून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला होम मिनिस्टर, एक मोहर अबोल आणि फु बाई फु यासारख्या शोमध्ये देखील काम मिळाले. त्याने नायक म्हणून नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटात काम केले.

हा चित्रपट बऱ्यापैकी चालला होता. मात्र, त्याला खऱ्या अर्थाने चला हवा येऊ द्या या शो मधूनच मोठी प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये अनेक कलाकार देखील आपल्याला मनोरंजन करताना दिसतात. यामध्ये भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर करंडे, भरत गणेशपुरे यासारखे दिग्गज कलाकार सहभागी होतात. आता नीलेश साबळे याचा एक जुना व्हिडिओ शेअर झाला आहे.

या जुन्या व्हिडिओमध्ये नीलेश साबळे एका गोंडस मुली सोबत बसलेला दिसत आहे. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की ही मुलगी नेमकी आहे तरी कोण, या मुलीला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून गौरी कुलकर्णी आहे. गौरी कुलकर्णी आज आपल्याला अनेक मालिका आणि चित्रपटात देखील दिसत असते.

चला हवा येऊ द्या या शोमध्ये गौरी कुलकर्णी ही लहानपणी सहभागी झाली होती. त्यावेळेस तिने निलेश साबळे सोबत फोटो काढला होता. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे, तर आपल्याला गौरी कुलकर्णी आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral