“आज खरंच बाबा हवे होते…”, अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणीत मुलगा वरद झाला भावूक

“आज खरंच बाबा हवे होते…”, अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणीत मुलगा वरद झाला भावूक

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेते आहेत की ज्यांना अल्पावधीतच यश मिळते. मात्र अनेक असे अभिनेत्री व अभिनेत्री आहेत की ज्यांना खूप स्ट्रगल करावी लागते. यामध्ये अनेक कलाकारांचा समावेश आहे. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशाच एका कलाकराबद्दल माहिती देणार आहोत.

गेल्या दहा वर्षांमध्ये तो काबाडकष्ट करून वर आला आहे. मात्र असे असूनही त्याला दहा वर्षानंतर यश मिळाले. आणि पहिला पुरस्कार मिळाला आहे. मराठी चित्रपटसृष्टी मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांच्या सारख्या कलाकारांनी अतिशय जबरदस्त असे काम केले आहे.

मकरंद अनासपुरे या मराठवाड्याच्या कलाकाराने देखील मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या नावाचा डंका कमावला आहे. मकरंद अनासपुरे याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नाव कमवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. विजय चव्हाण हे नाव देखील त्यापैकीच एक. विजय चव्हाण यांना मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अफाट यश मिळाले.

मात्र हे यश मिळवताना त्यांना अफाट कष्ट करावे लागले. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांना वर यावे लागले. अगदी चाळीमध्ये राहून त्यांना आपली गुजराण करावी लागली. यामध्ये कुटुंबाकडे देखील कधी कधी दुर्लक्ष व्हायचे. आता त्यांचा मुलगा वरद चव्हाण याने देखील मराठी चित्रपट सृष्टीमध्ये यश मिळवले आहे.

तब्बल दहा वर्षानंतर त्यांना पुरस्कार मिळाला आहे. त्याने आपल्या भावना कोणत्या शब्दात व्यक्त केल्या चला पाहूया. आई मायेचं कवच या मालिकेत इन्स्पेक्टर भास्कर लोखंडे म्हणजेच अभिनेता वरद चव्हाण याला पुरुष या वर्गवारीत कलर्स पुरस्कार मिळाला. यासाठी त्याने सोशल मीडिया वर सर्वांचे आभार मानून आवडते बाबा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना हा पुरस्कार समर्पित केला आहे.

खडतर प्रवासानंतर मिळालेली पहिली पोचपावती. आज खरच बाबा हवे होते. पण त्यांनी पाहिले असेलच याची मला पूर्ण खात्री आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी बायको प्रज्ञा चव्हाण आणि आई यांनाही धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करताना वरद चव्हाण याने सांगितले की मागील दोन वर्ष ही खूप अवघड गेले.

यासाठी मला सगळ्यांचा पाठिंबा मिळाला. महेश कोठारे सर यांचे विशेष आभार. त्यांनी देखील मला खूप पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे राजे सरांनी देखील मला खूप पाठिंबा दिला. भास्कर लोखंडे यांची भूमिका तुम्हाला आवडते यामध्ये माझे यश आहे असे त्याने सांगितले.

Team Hou De Viral