चिकन, मटनसोबत हे पदार्थ कधीही खाऊ नये.. अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार..

चिकन, मटनसोबत हे पदार्थ कधीही खाऊ नये.. अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार..

बदलत्या ऋतूनुसार आहार घ्यावा, असे आपले आयुर्वेदशास्त्र सांगते. मात्र, ऋतू बदलला तरी अनेक जण जड पदार्थाचे सेवन करत असतात. यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. पोटदुखी, अपचन, बद्धकोष्ठता असे अनेक आजार होतात. आपल्या भारतीय आहार शास्त्रांमध्ये ऋतूनुसार कसा आहार घेतला पाहिजे, हे विशद करण्यात आले आहे.

मात्र, याकडे कुणीही लक्ष देत नाही. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. सध्याच्या जमान्यामध्ये पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असल्याने घरामध्ये स्वयंपाक करण्यास वेळ भेटत नाही. त्यामुळे अनेक जण बाहेरचे जेवण करत असतात. त्यामुळे देखील इतर आजार होत असतात. त्यामुळे आपल्या आहाराकडे आपले कायम लक्ष असावे लागते. नाहीतर आपले पोट बिघडण्याची शक्यता असते. जर पोट दुखण्याची समस्या निर्माण झाली तरी त्यापासून इतर आजार निर्माण होतात.

पावसाळ्यामध्ये चिकन किंवा मटण हे खाल्ले नाही पाहिजे. हे पचायला जड असते आणि यामुळे पोटदुखीचा त्रास होतो. अनेक जण शिळे मटन, चिकन खातात. त्यामुळे त्यांना अनेक आजाराला सामोरे जावे लागते.आम्ही आज आपल्याला या लेखामध्ये कुठल्या पदार्थ सोबत कुठले पदार्थ खाऊ नये, हे सांगणार आहोत. अशा पदार्थाचे एकत्रित सेवन केल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

१. दुधासोबत : जर दुधासोबत दही, मीठ, आंबट, वस्तु, चिंच, मुळा, मुळ्यांची पाने दोडका, बेल, आंबट फळे, सातुचे पीठ हे खाऊ नये. कारण दुधासोबत याचे सेवन केल्यास आपल्याला पोटदुखी आणि इतर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

२. दह्या सोबत : खीर दूध पनीर गरम जेवण केळी डांगर मुळा इत्यादी पदार्थ खाऊ नये. यामुळे आपल्याला पोटदुखी किंवा अतिसार लागण्याची शक्यता असते.

३. मध, पनीर : चिकन, मटणसोबत कधीही मध किंवा पनीर खाऊ नये. यामुळे आपले पोट दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच दुध उसाचा रस, मध याचेही सेवन करू नये. यामुळे आपले पोट बिघडण्याची शक्यता असते.

Team Hou De Viral