‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मायरचा अपघात; मायरा‌ला झाली गंभीर दुखापत

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मायरचा अपघात; मायरा‌ला झाली गंभीर दुखापत

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका झी मराठीवरील असून या मालिकेतील चिमुरड्या मायराचे पाञ लक्षवेधी पात्र ठरले आहे. सध्या या मालिकेत यशचे आजोबा हे आजारी आहेत. त्यांना भेटण्यासाठी नेहाचे काका-काकू येतात.

सध्या यश आणि नेहा या दोघांच्या लग्नासाठी परीने होकार देणे महत्त्वाचे आहे, असे यशला नेहा सांगते. त्यावर आता यश चांगलीच कसरत करताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे परीने त्याचा बाबा म्हणून स्वीकार करणे, गरजेचे असते. परी या गोष्टीसाठी सुरुवातीला नकार देते.

कारण तिचे असे मत असते की, बाबा लोक नेहमी सोडून जात असतात. त्यामुळे मला बाबा नको तू माझा फ्रेंड अहो असे ती स्पष्ट सांगते. परीचा होकार मिळवण्यासाठी यश वेगवेगळ्या आयडिया करतो. आपण नुकत्याच एका भागात आपण पाहिले आहे की यश परीने हो म्हणावे म्हणून संपूर्ण दिवस तिच्या सोबत घालवतो.

त्यासाठी तो खूप सारे खेळणे आणतो. तसेच काही चालते बोलते. कार्टून देखील आणतो. परी म्हणजेच मायरा वायकूळ ही खूप लहान वयात प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. खूप लहान असल्यामुळे आणि गोंडस अभिनय करत असल्यामुळे प्रेक्षक देखील तिची उत्सुकतेने वाट पाहत असतात.

मायरा ही अवघ्या पाच वर्षांची असल्यामुळे तिला स्क्रिप्ट व्यवस्थित वाचता येत नाही. त्यामुळे तिला सेट वरील सर्व जण तिचा अभिनय करून दाखवतात. त्याप्रमाणे मालिकेत यश तिच्यासाठी खूप खेळणे घेऊन येतो. ती खेळत असतानाचा एक व्हिडिओ मायराने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नुकताच मालिकेत खेळत असताना मायरा अचानक पडल्याचा एक सीन दाखवण्यात आला आहे. हा सीन शूट करत असतानाचा व्हिडिओ मायराने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सीन शूट करत असताना या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर हे मायराला या सीन यसाठी मदत करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये मायराचा तिच्या दिग्दर्शक काकांवर किती विश्वास आहे, हे देखील यावेळी दिसून आले. हा व्हिडिओ शेअर करत मायराने कॅप्शन मध्ये म्हटले आहे हा विश्वास आहे परीचा तिच्या डायरेक्टर काकावरील. अजय मयेकर आणि अनिकेत दादावर असा शेवट झाला परीचा पडण्याचा.

हा सीन पाहून अनेक तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. या मालिकेतून मिळालेल्या लोकप्रियतेचा नंतर मायरा नुकतीच एका म्युझिक अल्बम मध्ये झळकली आहे. मायरा चे हे गाणं तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहे. या गाण्याचे शूटिंग होत असतानाचे अनेक व्हिडिओ मायराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या शिवाय मायरा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.

Team Hou De Viral