मराठी सिनेसृष्टीला धक्का ! प्रसिद्ध ‘लावणीसम्राज्ञी’ चे दुःखद निधन

मराठी सिनेसृष्टीला धक्का ! प्रसिद्ध ‘लावणीसम्राज्ञी’ चे दुःखद निधन

गेल्या काही दिवसापासून अनेक कलाकारांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण ऐकलेल्या आहेत. आता देखील एका प्रसिद्ध लावणी कलावंताचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पंढरपूर जवळ हा अपघात घडला आहे. शनिवारी रात्री घडलेल्या अपघातामुळे एका प्रसिद्ध लावणी कलावंताला आपण गमावले आहे.

काही दिवसापूर्वी प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले. त्यापूर्वी मराठमोळी अभिनेत्री कल्याणी जाधव हिचे निधन आहे. तिचा मृत्यू झाल्याने अनेकांना सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये धक्का बसला आहे, तर आता एक लावणी कलावंत आपल्याला सोडून गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. आम्ही ज्या लावणी कलावंताबद्दल बोलत आहोत त्या लावणी कलावंताचे नाव मीना देशमुख असे होते.

मीना देशमुख या पंचक्रोशीमध्ये खूप मोठ्या कलाकार होत्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचे अनेक मोठे कार्यक्रम देखील झाले होते. त्यांच्या लावणीच्या गाण्यावर अनेक जण ठेका देखील धरताना दिसत होते. अनेक छोटे-मोठे पुरस्कार देखील त्यांना मिळालेले होते. मीना देशमुख या प्रवास करत असताना त्यांच्यासोबत हा भीषण अपघात घडला.

मोडलिंबकडून पंढरपूरकडे जाताना रविवारी रात्री एक फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली. यात ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्याला सुरुवात केली.

गावकऱ्यांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावली आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कार कालव्यात पडल्यानंतर मदत करायला थोडा उशीर झाला. कारण आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे बाहेर सर्वांना काढता येत नव्हते. मात्र, अनेक जणांनी प्रयत्न करून सर्वांना बाहेर काढले आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून देशमुख यांना मृत घोषित केले.

त्यांच्या मृत्यूनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे देशमुख या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत्या आणि त्या आता अशा पद्धतीने गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Team Hou De Viral