या अभिनेत्रीने सोडली ‘बायको अशी हवी’ मालिका, या व्यक्तीसोबत झाला प्रचंड वाद ?

या अभिनेत्रीने सोडली ‘बायको अशी हवी’ मालिका, या व्यक्तीसोबत झाला प्रचंड वाद ?

कलर्स मराठी वर सध्या वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. या यामध्ये “बायको अशी हवी” ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. ही मालिका टीआरपीच्या बाबतीत देखील वरचढ सध्या ठरत आहे. या मालिकेतील अनेक भूमिका या प्रेक्षकांना आवडतात. मात्र, त्यातल्या त्यात मीरा जोशीची भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली आहे.

मीरा जोशी हिने या मालिकेमध्ये राखी नावाचे पात्र साकारले आहे. तिचे पात्र प्रेक्षकांना चांगलच आवडते. मीरा जोशी अभिनेत्री सोबतच प्रसिद्ध नृत्यांगना देखील आहे. ती अनेक ठिकाणी आपल्या नृत्याची शो करत असते आणि तिला याची आवड लहानपणापासूनच लागलेली आहे. मीरा जोशी आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपले बोल्ड फोटो अपलोड करत असते.

तिच्या फोटोला राहते लाईक आणि शेअर देखील करत असतात. त्याचप्रमाणे ती अनेक मासिकांसाठी देखील असे बोल्ड फोटोग्राफ देत असते. मध्यंतरी तिने एक बिछान्यावरचा केलेला फोटोशूट चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतरही ती आपले फोटो शूट करत असते. काही दिवसापूर्वीच मीरा जोशी हिने एक विश्वविक्रम नोंदवला आहे. मीरा जोशी हिने तुंगनाथ येथील शिव मंदिरा समोर शिव वर्णन नृत्य केले आहे.

तुंगनाथ हे मंदिर 11300 फुटावर आहे. एवढ्या उंचीवर नृत्य करणारी ती जगातील पहिली अभिनेत्री ठरली आहे. याबाबतचा विश्वविक्रम देखील तिने केलेला आहे. मीरा जोशी हिचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. बायको अशी हवी या मालिकेमध्ये मीरा जोशी हिने राखी हे पात्र साकारले आहे. तिच्या पात्राला तिने न्याय देण्याचा देखील प्रयत्न केला आहे. तिची ही भूमिका नकारात्मक आहे.

मात्र, तीची नकारात्मक भूमिका साकारलेले असली तरी ती प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली आहे. मीरा जोशी आता बिग बॉस थ्री मध्ये लवकरच दिसणार असल्याचेही सांगण्यात येते. याबाबतच्या बातम्या देखील सोशल मीडियातून अनेकदा आलेल्या आहेत. त्यामुळे आता ती नेमकी बिग बॉस मध्ये दिसणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे. असे असले तरी “बायको अशी हवी” ही मालिका मीरा जोशी हिने सोडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

तिची मालिकेतील भूमिका संपल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच तिने ही मालिका आता सोडली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आपल्याला मीरा जोशी या मालिकेत दिसली नाही तर आश्चर्य वाटून घेऊ नका. तिचा कोणासोबतही काही वाद झाला नाही. मात्र काही जणांनी याबाबत गैरसमज केले होते. केवळ भूमिका संपल्यामुळे तिने मालिका सोडली आहे.

Team Hou De Viral