‘अजून किलोभर माती खा’ ! ‘बिगबॉस’ मधील महिला स्पर्धकांवर ही अभिनेत्री संतापली

‘अजून किलोभर माती खा’ ! ‘बिगबॉस’ मधील महिला स्पर्धकांवर ही अभिनेत्री संतापली

कलर्स मराठीवर सुरू असलेला मराठी बिग बॉस हा शो कायमच चर्चेत असतो. यंदाचा बिग बॉस हा शो 19 सप्टेंबर पासून सुरू झाला आहे. हा शो पहिल्या दिवसापासूनच वादाच्या गर्तेत सापडलेला आहे. कारण पहिल्या दिवसापासून शो मध्ये भांडणे होताना दिसताहेत. मीरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघ यांचे पहिल्याच दिवशी जेवणावरून भांडण झाले होते.

त्याचप्रमाणे वेगवेगळ्या टास्क दरम्यान देखील सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसत आहेत. गेल्या भागांमध्ये आपण सुरेखा कुडची आणि स्नेहा वाघ यांच्या मतांच्या घोळामुळे कॅप्टन पद न मिळाल्याने अनेक जण नाराज झाले, तर यावरून महेश मांजरेकर यांनी देखील या दोघींना चांगलेच खडे बोल सुनावले.

तुमच्या मताच्या घोळामुळे एक चांगला स्पर्धक कॅप्टन होऊ शकला नाही, असे त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे या शोमधून शिवलीला बाळासाहेब पाटील कीर्तनकार देखील आता बाहेर पडली आहे. शिवलीला पाटील हिने नुकतेच आपल्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल सांगितले. पंढरपूर येथील एका कार्यक्रमासाठी आली असताना तिने पत्रकारांशी संवाद साधला.

जर माझ्या सहभागाने वारकरी संप्रदायाचे मन दुखावले असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागते. मात्र, माझा हेतू हा अतिशय प्रामाणिक होता. बिग बॉसच्या घरामध्ये मी नृत्य केल्याचा आरोप होत आहे. मात्र, मी डान्स केला ते एका धार्मिक गाण्यावर केला, असेही ती म्हणाली.

या शोमध्ये सध्या भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई, अविष्कार दारव्हेकर, स्नेहा वाघ, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, विशाल निकम, आदिश वैद्य, मीनल शहा, सुरेखा कुडची, सोनाली पाटील यासारखे कलाकार सहभागी झाले आहेत. आता या शो च्या स्पर्धकवरून देखील बिग बॉस ची पहिली विजेती मेघा धाडे हिने चांगलीच टीका केली आहे.

ती म्हणाली की, या शोमध्ये महिला या अजिबात चांगल्या खेळत नाहीत. “किलोभर माती खा”तुम्ही. असे ती म्हणाली. मताच्या घोळामुळे एखाद्याचे कॅप्टन पद जाणे हे अतिशय दुर्दैवी असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच दादुस हादेखील चांगला खेळत होता. मात्र, या महिलांमुळे तो कॅप्टन पदापर्यंत पोहोचू शकला नाही.

त्याचप्रमाणे केवळ या शोमध्ये सध्या मीनल शहा ही चांगली खेळत आहे. मात्र, इतर महिलांना या शोमध्ये काय करावे, तेच कळत नाही, असे देखील मेघा हिने म्हटले आहे. आता मेघाच्या वक्तव्यावरून देखील वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Team Hou De Viral