अखेर हा सदस्य पडला ‘बिगबॉस मराठी’ च्या घराबाहेर, प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात शो वर होतेय टीका

अखेर हा सदस्य पडला ‘बिगबॉस मराठी’ च्या घराबाहेर, प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात शो वर होतेय टीका

कलर्स मराठी वर सुरू असलेला मराठी बिग बॉस हा शो सुरू होऊन आता जवळपास तीन आठवड्याचा कालावधी लोटला आहे. या कालावधीमध्ये आपल्याला अनेक मनोरंजनात्मक किस्से या शोमध्ये पाहायला मिळाले. या शोमध्ये निखिल राज शिर्के हा सगळ्यात आधी बाहेर पडल्याचे आपण पाहिले. तर आता देखील एक स्पर्धक या शोच्या बाहेर पडली आहे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये आपल्याला अनेक स्पर्धक सहभागी झाल्याचे दिसत आहेत. यामध्ये यशश्री मसुरेकर, तेजश्री लोणारे, समृद्धी जाधव, उशिरा जाधव, योगेश जाधव, डॉक्टर रोहित शिंदे, प्रसाद जवादे, अपूर्वा नेमळेकर, अमृता देशमुख, मेघा घाडगे, अमृता धोंडगे यांच्यासह किरण माने, विकास सावंत हे देखील सहभागी झाल्याचे आपण पाहिले आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये अनेक मनोरंजनात्मक किस्से घडत असल्याचे आपण अनेकदा पाहिलेले आहे. बिग बॉस सुरू झाला, त्या पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये प्रचंड भांडण झाल्याचे आपण पाहिले. मात्र, खऱ्या अर्थाने बिग बॉसच्या घरामध्ये अपूर्वा कशी रंग दाखवते असे म्हणावे लागेल.

कारण सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून अपूर्वा ही वादग्रस्त ठरली आहे. प्रसाद जवादे याच्यासोबत तिने वाद घातल्यानंतर किरण माने यांना देखील एकेरी भाषेत उल्लेख करून चांगलेच सुनावले होते. त्यानंतर अर्थात बिग बॉस यांनी अपूर्वा नेमळेकर हिची आठवड्याच्या चावडीवर शाळा घेतली होती. त्यानंतर तिला चांगले सुनावले.

त्यानंतरही अपूर्वा नेमळेकर हिचा रुबाब काही कमी झाला नाही. तिने अनेक सदस्यांसोबत जोरदार भांडण या शोमध्ये केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आठवड्यात घराच्या बाहेर पडेल, असे सांगण्यात येते. मात्र, बिग बॉस घरातून आता दुसरा सदस्य बाहेर पडला आहे. प्रसाद जवादे हा देखील घराच्या बाहेर पडला. त्यावेळेस त्याने देखील अनेक खुलासे याबाबत केले होते.

किरण माने यांच्यावर प्रसाद याने चांगलीच टीका केली होती. प्रसाद म्हणाला होता की, किरण माने नावाचा माणूस हा एक दिवस घराच्या बाहेर पडणार आहे आणि हा माणूस खूपच वाईट प्रकारे खेळत असतो, असे सांगितले होते, तर आता बिग बॉस घरामध्ये अमृता धोंडगे, अमृता देशमुख आणि मेघा घाडगे या इलीनिमेशन राउंड मध्ये सिलेक्ट झाल्या होत्या.

मात्र, आता या घराच्या बाहेर अमृता धोंडगे नाही तर मेघा घाडगे ही बाहेर पडली आहे. मेघा घाडगे ही बाहेर पडल्याने अनेकांना आश्चर्य देखील वाटले आहे. कारण ती चांगला खेळ खेळत असताना ती कस काय बाहेर पडली, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. मात्र, प्रेक्षकांच्या वोटिंग वरच ती बाहेर पडण्याची बोलले जात आहे, तर यावर आपले काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral