साऊथची ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार मराठी चित्रपटात, फोटो झाला व्हायरल

साऊथची ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार मराठी चित्रपटात, फोटो झाला व्हायरल

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्याचा कल हा गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पाहायला मिळत आहे. मराठीतील अनेक कलाकार हे दक्षिणेमध्ये जाऊन चित्रपट करतात. त्यांना तिकडे अतिशय चांगल्या पद्धतीने मानधन आणि वागणूकही मिळत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे गेल्या काही वर्षांमधून दक्षिणेत काम करण्याकडे मराठी चित्रपट सृष्टीतून मोठ्या प्रमाणात ओढा वाढत असल्याचे दिसत आहे. याचे कारणही त्यांना तातडीने चांगले पैसे आणि चित्रपटही मिळत आहेत. या तुलनेमध्ये मराठीमध्ये त्यांना अधिक मानधन मिळत नाही.

मराठी मालिका विश्वात आता काहीशा संधी उपलब्ध असल्या तरी नवेदित कलाकारांना त्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे दक्षिणेकडे अनेक जण आपला मोर्चा वळवताना दिसत आहेत, तर गेल्या काही वर्षापासून दक्षिणेतील कलाकार मात्र मराठी किंवा हिंदी चित्रपटात काम करताना अजिबात दिसत नाहीत.

ज्यांना मराठीची थोडी बहुत जाण आहे, असे कलाकार काही हिंदी चित्रपटात आणि मराठी चित्रपटात दिसले आहेत. मात्र, आता दक्षिणेमधील एक आघाडीची अभिनेत्री लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे. याबाबतच या लेखामध्ये जाणून घेऊ.

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री मेघा शेट्टी लवकरच मराठी चित्रपट पदार्पण करणार आहे. मेघा शेट्टी ही कन्नड चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही आणि मालिका यामध्ये देखील आपल्या अभिनयाने अतिशय जबरदस्त काम करून सगळ्यांचे मन जिंकले आहेत. मेघा हिची जोथे जोलाई ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

त्यानंतर तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर देखील मिळाल्या होत्या. ट्रायबल राइडिंग आणि दिल पसंद या चित्रपटात तिने काम केले होते. या चित्रपटातील तिच्या भूमिका देखील खूप लोकप्रिय ठरल्या होत्या. कन्नड चित्रपट सृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्री म्हणून मेघा हिचे नाव घेतले जाते. आता मेघा ही लवकरच मराठीमध्ये पदार्पण करणार आहे.

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्टरी यांची निर्मिती असलेला आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या रोमँटिक आणि मारधाड असणाऱ्या चित्रपटात ती दिसणार आहे. कन्नड स्टार कवी शेट्टी या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबतच पोस्टर नुकतच सादर करण्यात आले असून या पोस्टमध्ये मेघा आहे.

ती अतिशय जबरदस्त अशी दिसत आहे. आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेमध्ये चित्रित झाला आहे, तर हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम या भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते. या सिनेमांमध्ये कन्नड कलाकार कवीश शेट्टी मेघा शेट्टी यासोबतच मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेत्री शिवानी सुर्वे, विराट मडके यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.

सदागरा राघवेंद्र यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते.

Team Hou De Viral