‘हे’ मधुमेहावर आहे रामबाण औषध, ‘हा’ सोपा उपाय करा, जाणून घ्या इतर फायदे

मधुमेह हा आजार अलिकडे मोठ्याप्रमाणात वाढला आहे. महत्वाचे म्हणजे यापूर्वी केवळ वृद्ध व्यक्तींमध्ये आढळणारा हा आजार आता बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटात आढळून येत आहे. या आजारावर मेथीदाणे हे रामबाण औषध आहे.
यामुळे अॅनिमिया म्हणजेच शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते. कोलेस्टेरॉलदेखील नियंत्रणात राहते. मेथीदाणे विविध आजारांवर कसे उपयोगी आहेत, तसेच हे उपाय कसे करावेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
१) मधुमेह, कोलेस्टेरॉल, प्रतिकारशक्ती – यात भरपूर फायबर आणि स्टेरॉइड असते. यामुळे मधुमेहाच्या रूग्णांना आवश्यक असलेल्या इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. तसेच रोग प्रतिकारशक्तीतही वाढते.
२) आर्थरायटीस, साईटिका – या दोन आजारांवर हे रामबाण औषध आहे. एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडरचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसात दोन ते तीन वेळा घ्यावे.
३) अपचन – एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते.
४) केसातील कोंडा – केसांतीलमध्ये कोंडा दूर करण्यासाठी मेथीदाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. अर्धा तासाने केस धुवून सुती कापडाने कोरडे करा.
५) केसगळती – मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा.
६) संधिवात – हा त्रास असल्यास मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करा. गुळ टाकून हे चूर्ण खा.
७) जळाल्याचे व्र-ण – जळाल्याचे व्र-ण असल्यास त्यावर मेथीदाण्याच्या पावडरची पेस्ट तयार करून लावा.
८) गॅस, कफ – पोटात गॅस होणे, छातीत कफ होणे, या समस्या दूर करण्यासाठी दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खा. यामुळे वातरोग दूर होतात.
९) अपचन, बद्धकोष्ठता – अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत. सकाळ-संध्याकाळ हा उपाय केल्यास बद्धकोष्ठता, अपचनाची समस्या नष्ट होते.
१०) उच्चरक्तदाब – उच्चरक्तदाबाचा त्रास असल्यास अर्धा चमचा मेथीदाणे रात्रभर गरम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठून हे पाणी प्या. तसेच भिजलेले मेथीदाणे चाऊन खा.
११) लठ्ठपणा – याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होते. हार्मोन संतुलित राहते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.