ही आहे अनिरुद्ध ची रिअल लाईफ ‘अरुंधती’, स्टेशनवर सुरू झाली होती लव्हस्टोरी

ही आहे अनिरुद्ध ची रिअल लाईफ ‘अरुंधती’, स्टेशनवर सुरू झाली होती लव्हस्टोरी

स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील “आई कुठे काय करते” ही मालिका रोज नवनवीन ट्विस्ट घेऊन प्रेक्षकांसाठी येत असते. यातील पात्रही उत्कृष्टपणे अभिनय करतात. सध्या या मालिकेत गोकुळाष्टमी या उत्सवावर काही भाग दाखवण्यात आले होते. संजना गोकुळाष्टमीची अनिरुद्ध सोबत पूजा करण्यासाठी खूप उत्सुक असते. तिला गोकुळाष्टमीची पूजा केव्हा करतात, हे देखील माहिती नसते.

त्यामुळे ती सकाळी लवकर उठून तयार होते. तिला वाटते की, पूजा सकाळीच असते. ती तयार होऊन खालती येते तेव्हा तिला समजते कि गोकुळाष्टमी ची पूजा रात्री आहे. तिला घरातील सर्वजण पूजा रात्री आहे असे सांगतात आणि घरातील पूजेच्या तयारीस मदत करण्यास सांगतात. विशाखा तिला आवरून स्वयंपाक घरात आणि पूजेच्या तयारीस मदत करायचे सांगते. ती जाते व चेंज करते त्या नंतर अनिरुद्ध म्हणतो की एवढ्या सकाळी बाहेर कुठे गेली होती.

संजना सांगते की, पूजा सकाळी आहे, असे वाटल्यामुळे मी तयार होऊन खाली गेले. मला कळाले की पूजा रात्री आहे. म्हणून आता आवरून खाली कामास मदतीला जाणार आहे. तोपर्यंत सर्व पूजेची तयारी अरुंधती करून ठेवते. रात्री पूजा होते, त्यावेळी निखिल विचारतो अनिरुद्ध आणि संजना एकत्र सोबत का बसले. निखिल च्या बाल मनाला हे माहिती नसते की या दोघांनी लग्न केलेले आहे. या वेळेस अरूंधती निखिलला समजावून सांगते आणि त्या दोघांना पूजा करू दे, नंतर आपण दोघे करू असे सांगते.

पूजा पार पडते .या मालिकेत अनिरुद्धला अरूंधती व संजना अशा दोन पत्नी सध्या आहेत. त्याने अरुंधती पासून घटस्फोट घेतला आहे. आज आम्ही आपल्याला अनिरुद्ध याच्या खरया बोयकोबबत माहिती देणार आहोत. अनिरुद्धला वास्तविक जीवनात या दोघींपेक्षा खूप सुंदर पत्नी मिळाली आहे. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याविषयी….अनिरुद्धचे खरे नाव मिलिंद गवळी असे आहे. अनिरुद्धचे अरेंज मॅरेज आहे. मिलिंद गवळी यांचा लग्नाविषयी पण गंमत आहे.

त्याने आपल्या पत्नीला सर्वप्रथम जळगाव रेल्वे स्टेशन वर पाहिले व तिथेच तिच्या प्रेमात पडला. तेव्हा मिलिंदला ही मुलगी कोण आहे माहिती नव्हते. तिच्या विषयी संपूर्ण माहिती नव्हती. त्यामुळे ही गोष्ट जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती. मात्र, पुन्हा या दोघांची भेट एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभात झाली.त्यानंतर मिलिंदने हा विषय सोडला नाही. तिची सर्व माहिती काढली. नंतर तिचे नाव दीपा आहे असे कळले.

दीपाची माहिती मिळाल्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितले. दीपा ही त्यांच्या नात्यातलीच आहे त्याला काही दिवसांनी समजले. मिलिंदच्या घरचे दीपाला मागणी घालण्यासाठी तिच्या घरी गेले. त्यावर दिपाच्या घरच्यांनी एक अट ठेवली होती. ती अट म्हणजे जावई सरकारी नोकरीवाला हवा होता.

आता मिलिंद या अटीला नकार कसा देणार. कारण तो प्रेमात पडलेला होता. युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असते, म्हटल्याप्रमाणे मिलिंद स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आणि त्यानंतर तो परीक्षाही पास झाला. सरकारी नोकरी लागल्यानंतरच या दोघांचे लग्न झाले. दीपा आणि मिलिंद यांना एक मुलगी आहे. तिचेही काही दिवसांपूर्वी लग्न झाले आहे.

Team Hou De Viral