‘मिर्झापुर’ वेबसिरीज च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, वेबसिरीज मधल्या कलाकाराचे दुःखद निधन

‘मिर्झापुर’ वेबसिरीज च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, वेबसिरीज मधल्या कलाकाराचे दुःखद निधन

बॉलीवूडमध्ये एका मागून एक धक्के बसणे अजून सुरूच आहे. आता देखील एका दिग्गज कलाकाराचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत आपल्याला बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते संजय मिश्रा यांनी माहिती दिली आहे. संजय मिश्रा यांनी ट्विटरवरही माहिती देताना आपल्याला अति दुःख झाल्याचे म्हटले आहे.

संजय मिश्रा यांनी माहिती देताच अनेक कलाकारांनी या कलाकाराला श्रद्धांजली अर्पण केली आहे. गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांचे निधन झाल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. त्यामुळे आता या कलाकाराचे नाव देखील त्या यादीमध्ये जोडले गेले आहे.

संजय मिश्रा यांनी माहिती देऊन सांगितले आहे की, बॉलीवूडमध्ये तसेच नाटक, मालिका यामध्ये रमणारे माझे सहकारी जितेंद्र मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले आहे. जितेंद्र मिश्रा यांनी अनेक चित्रपट मालिकातही काम केले होते. त्यांच्या अनोख्या अशा अभिनयाने सगळ्यांची मने त्यांनी जिंकली होती. जितेंद्र शास्त्री हे अतिशय सहज सुंदर अभिनेते होते.

कमी बोलून ते अधिक संवाद चाहत्यांपर्यंत पोहोचवायचे. त्यांची हीच बोलण्याची पद्धत प्रेक्षकांना खूप आवडत होती. ब्लॅक फ्रायडे चित्रपटात त्यांनी केलेला अभिनय आजही शिक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील त्यांचा अफलातून अभिनय हीच त्यांच्या अभिनयाची पावती आहे.

संजय मिश्री यांनी माहिती देताच अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. मनोज वाजपेयी यांनी देखील जितेंद्र मिश्रा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जितेंद्र मिश्रा हे अतिशय जबरदस्त कलाकार होते. जितेंद्र मिश्रा यांनी चरस, ब्लॅक फ्रायडे, इंडियन मोस्ट वॉन्टेड, लज्जा यासारख्या चित्रपटात आपल्या अफलातून अभिनयाने चाहत्यांची मन जिंकली होती.

आता त्यांचे निधन झाल्याने बॉलीवूडमध्ये एकच शोककळा पसरली आहे. जितेंद्र शास्त्री यांच्यावर गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांना नेमकं काय झालं होतं, याबाबतचे कारण काही कळू शकले नाही.

जितेंद्र शास्त्री यांनी काम केलेला कुठला चित्रपट आपल्याला आवडला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्यांना आपण श्रद्धांजली देखील अर्पण करू शकता.

Team Hou De Viral