या दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीने या घेतला अखेरचा श्वास…

या दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीने या घेतला अखेरचा श्वास…

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक कलाकार हे जग सोडून जाताना आपण पाहिलेले आहेत. आता देखील मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एका अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. एक दीड महिन्यापूर्वी भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते.

लता मंगेशकर या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. या आजारातून त्यानंतर सावरू शकल्या नाही आणि त्यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांच्या आधी मराठीतील व हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते रमेश देव यांचे दुःखद निधन झाले.

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टी मधील आघाडीचा अभिनेता आदित्य दुर्वे याच्या देखील आईचे निधन झाले होते. आदित्य दुर्वे याने सोशल मीडियावर या बाबत पोस्ट करून माहिती दिली होती. आई तू मला सोडून गेली असली तरी तू माझा सोबतच कायम आहेस. त्यामुळे माझ्यासोबत राहा आणि मला आशीर्वाद दे, असे त्याने म्हटले होते.

आदित्य सध्या सोन्याची पावलं या मराठी मालिकेमध्ये आपल्याला दिसत आहे. आता देखील अभिनेञी मिथिला पालकर हिच्या एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. मिथिला पालकर ही मराठी चित्रपटसृष्टी मधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून गणली जाते.

सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना ती वेळोवेळी अपडेट आणि आपली फोटो देखील शेअर करत असते. तिच्या या फोटोला अनेक जण लाईक देखील करत असतात. मिथिलाने आता नुकताच एक फोटो शेअर करत दुःखद बातमी सांगितली आहे.

मिथिला पालकरच्या जवळच्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे. ही व्यक्ती म्हणजे तिचे आजोबा. मिथिलाच्या आजोबांनी तिला खूप प्रेम दिलं. मिथिला ही त्यांना प्रेमाने भाऊ असे म्हणायची. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी नुकताच अखेरचा श्वास घेतला. 26 मार्च रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याचे तिने म्हटले आहे

मिथिला हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक भावनिक पोस्ट लिहित आपल्या आयुष्यातील या पहिल्या प्रेमाला अलविदा म्हटले आहे. त्यामुळे अनेक जण चकीत झाले होते. त्यानंतर हे स्पष्ट झाले की, तिचे हे आजोबा होते. या पोस्टमध्ये मिथिला म्हणाली की, माझ्या विश्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आणि मला नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीमध्ये असणारे माझे भाऊ यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे.

त्यांच्या शिवाय असणारे आयुष्य मला ठाऊक नाही आणि पुढे काय होणार हे देखील कळणार नाही, असे तिने म्हटले आहे. त्यांची आयुष्य जगण्याची उमेद ही वेगळी होती. ते एक लढवय्ये होते. माझ्यासाठी माझे आजोबा हे खास होते आणि कायम ते अग्रस्थानी राहतील. जिथे असाल तिथे खूप छान राहा भाऊ. आता स्वर्गातही आनंदी वातावरण असेल, तुमच्या त्या हसण्यामुळे.

अशी पोस्ट मिथिला हिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी देखील आदरांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मिथिला ही बरीच वर्षे तिच्या आजी-आजोबांच्या मुंबईतील घरी वास्तव्यात होती. त्यामुळे तिच्याशी आजोबांचे खास नाते होते.

Team Hou De Viral