या अभिनेत्रीच्या ‘प्रेमात’ पुरते वेडे झाले होते मिथुनदा, त्यांच्या बायकोने आ त्म ह त्याचा देखील प्रयत्न केला होता

या अभिनेत्रीच्या ‘प्रेमात’ पुरते वेडे झाले होते मिथुनदा, त्यांच्या बायकोने आ त्म ह त्याचा देखील प्रयत्न केला होता

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या आयुष्य खूपच चढउतार होते. आयुष्यातही तिने खूप संघर्ष केला. श्रीदेवी आणि बोनी कपूरची प्रेमकथा खूपच रंजक होती परंतु श्रीदेवीचे नाव आणखीन बऱ्याच स्टार्सशी जोडले गेले होते. मिथुन आणि श्रीदेवीच्या अफेअरच्या गोष्टी बर्‍यापैकी गाजल्या होत्या. श्रीदेवी मिथुनबद्दल बरीच गंभीर होती पण नंतर दोघांमध्ये अंतर आले.

अगोदरच लग्न झालेल्या मिथुनचे श्रीदेवीवर प्रेम जडले –

मिथुन चक्रवर्तीचे लग्न झालेले असूनही श्रीदेवीच्या प्रेमात मिथुन वेडा झाला होता. मिथुनने अभिनेत्री योगिता बालीशी 1979 मध्ये लग्न केले. यापूर्वी योगिता बालीने गायक किशोर कुमारशी लग्न केले होते. किशोरला घटस्फोट दिल्यानंतर तिने मिथुनशी लग्न केले. मिथुन आणि श्रीदेवी यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. दोघे चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. दोघांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

जेव्हा श्रीदेवी आणि मिथुनच्या अफेअरची चर्चा रंगू लाया, तेव्हा याची भनक योगिता लागली. यावर योगिताने मिथुनला श्रीदेवीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. जरी तिने याबद्दल सार्वजनिकपणे काही न बोलले असले तरी श्रीदेवीने तिच्या विवाहित जीवनात प्रवेश केल्यामुळे तिला फार वाईट वाटले.

या दोघांच्या अफेअरची चर्चा इथपर्यंत चालली होती की त्यांनी गुपचूप लग्न केले अश्या बातम्याही येत होत्या. या दोघांना वेगळे करण्याचा योगिता बालीने खूप प्रयत्न केला, पण श्रीदेवी आणि मिथुन कोणत्याही किंमतीत वेगळे होण्यास तयार नव्हते. यामुळे योगिताने एकदा आ-त्म-ह-त्येचा प्रयत्नही केला होता.

बोनी कपूरला राखी बांधली –

त्याचवेळी बोनी कपूरलाही श्रीदेवी आवडत होती. बोनीच्या पत्नीला हे समजले. मोना कपूर यांनी श्रीदेवींना याबाबत सांगितले. श्रीदेवीने बोनीला मिथुनबद्दल सांगितले. श्रीदेवी मिथुनच्या प्रेमात असतानाच तिने बोनी कपूरला भाऊ म्हणून राखी बांधली.

अशा प्रकारे श्रीदेवी आणि मिथुन मध्ये अंतर वाढले –

मिथुनला एका बाजूला श्रीदेवी ही आवडत होती पण त्याला पत्नी योगितालाही सोडायचे नव्हते. श्रीदेवीची इच्छा होती की मिथूनने योगीताला पत्नीला घटस्फो-ट द्यावा जेणेकरुन ती त्याच्याशी लग्न करू शकेल. जेव्हा मिथुन घटस्फो-टासाठी तयार नव्हता. श्रीदेवी हळू हळू मिथुनपासून दूर गेली.

Team Hou De Viral