दररोज सकाळी मोड आलेली ‘कडधान्य’ खा, आणि घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे

दररोज सकाळी मोड आलेली ‘कडधान्य’ खा, आणि घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे

धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या तणावामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळतोच असे नाही. त्यामुळे आजारपणाच्या समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढतात. पण हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक चांगला उपाय आहे. मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

मोड आलेली कडधान्य पोषक तत्वांनी परिपूर्ण असतं. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यासाठी त्यांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही मोड आलेल्या कडधान्यांच्या फायद्यांबाबत माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. याव्यतिरिक्तही अनेक फायदे होतात.

जाणून घेऊया मोड आलेल्या कडधान्याचे फायद्यांबाबत

नाश्त्यासाठी मोड आलेली कडधान्य अत्यंत फायदेशीर ठरतात. अनेकदा आपल्याला सांगितले जाते की, पोटभर नाश्ता करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे नाश्त्यामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन केरणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. एवढचं नाही तर सोयाबिन, काळे चणे, मूगाची डाळ यांसारखे पदार्थ खाल्याने शरीराला आणखी पोषक तत्व मिळाल्याने फायदे होतात.

पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी

मोड आलेले कडधान्य खाल्याने पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होते. फायबरयुक्त मोड आलेले कडधान्य खाल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते.

पोषक तत्व मुबलक प्रमाणात

मोड आलेले कडधान्यांमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ए, बी, सी, ई मुबलक प्रमाणात असतात. एवढचं नव्हे तर त्यामध्ये फॉस्फरस, आयरन, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यांसारखी पौष्टिक तत्व असतात. अॅन्टी-ऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी मदत होते. तसेच कॅल्शिअममुळे हाडांमध्ये ताकद येते. आयर्न रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी मदत करतं.

प्रोटीन युक्त आहार

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं जे शरीराच्या मजबुतीसाठी आणि आजार दूर ठेवण्यासाठी मदत करतं.

कमी कॅलरी असलेले पदार्थ

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कॅलरी फार कमी असतात जे लठ्ठ लोकांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा डाएटवर असाल तर मोड आलेले कडधान्य फायदेशीर ठरतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral