मराठी सिनेसृष्टीला धक्का ! जेष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन, मुख्यमंत्री साहेबांनी वाहिली श्रद्धांजली

मराठी मनोरंजन विश्वाला आणखीन एक धक्का बसला आहे. मराठी चित्रपटसृष्टी, नाटक आणि इतर क्षेत्र गाजवून सोडणारे जेष्ठ कलावंत यांचे नुकतेच निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी कलाकारण आपल्याला सोडून जाण्याचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध अभिनेते सुनील शेंडे यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आता तोच मराठी चित्रपट नाटक आणि समाज कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या एका ज्येष्ठ रंगकर्मीचे निधन झाले आहे. आम्ही बोलत आहोत मोहनदास सुखटनकर यांच्या बद्दल. मोहनदास सुखटनकर यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले.
मोहनदास यांनी एकच प्यायला, मस्तगंगा, लग्नाची बेडी, लेकुरे उदंड झाली, संशय कल्लोळ अशा गाजलेल्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. मोहनदास श्रीपाद सुखटनकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील अंधेरी येथील घरी निधन झाले. त्यांच्यावर पारशी वाडा स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही वर्षापासून ते आजारी होते. गोव्यातील नामांकित डॉक्टर श्रीपाद सुखटनकर यांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे बालपण गोव्यातच गेले.
मापसा येथील सारस्वस्त विद्यालयात त्यांचे दुसरी मध्ये शिकत असताना खोडकर बंडू, छोट्या नाटकातील काम करण्यास संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. या नाटकामध्ये त्यांना बक्षीस देखील मिळाले आणि त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी नाटक क्षेत्रामध्ये काम सुरू करायला सुरुवात केली.अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सादर केलेल्या बळी आणि लाल गुलाबाची भेट या एकांकिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले.
1990 मध्ये ते एलआयसी मधून निवृत्त झाल्यानंतर गोवा हिंदू असोसिएशनचे काम सांभाळून रेडिओ चित्रपट मालिका नाटक या सगळ्यातून काम करायचे गाजलेली नाटके त्यांनी अनेक केली. अखेरचा सवाल, आभाळाचे रंग, एकच प्याला, दुर्गा, मत्स्यगंगा, राणीची बाग, वेड्याच्या चौकोन, लग्नाची बेडी, लेकुरे झाली उदंड, शारदा, संशयकल्लोळ, स्पर्श अशा नाटकांमधून त्यांनी अभिनय केला.
त्याचप्रमाणे चांदणे शिंपीत जा, थोरली जाऊ, वाट पाहते पुनवेची, जन्मदाता, पोरका, प्रेमांकुर, निवडुंग अशा काही निवडक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी अतिशय लोकप्रिय अशा भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनानंतर अवघी मराठी चित्रपटसृष्टी हळहळली आहे. सुखठणकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून असा कलाकार कधीही होणे नाही, असे म्हटले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.