वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत ‘या’ बिया, जाणून घ्या त्या ‘बी’ बद्दल

वाढत्या वजनामुळे अनेक जण त्रस्त झाल्याचे पाहिले असेल. बाहेरच्या खाण्यामुळे आणि रात्री अवेळी जेवण केल्यामुळे वजन वाढ समस्या अनेकांना जडलेली आहे. वजन वाढलेले कमी करण्यासाठी अनेक जण मोठ्या शस्त्रक्रिया देखील करत असतात. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचेही असेच वजन वाढलेले होते.
काही वर्षांपूर्वी त्यांनी सर्जरी करून आपले वजन हे कमी केले. मात्र, सर्जरी करून वजन कमी करणे हे धोकादायक मानले जाते. त्यामुळे नैसर्गिक रित्या वजन घटवणे हे कधीही चांगले. मात्र, आपण वजन वाढू दिले नाही तर किती छान. मात्र, असे होताना दिसत नाही. आपण योग्य आहार घेतला तर आपले वजन हे नियंत्रणात राहते.
मात्र, आपण चरबीयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले तर आपले वजन हे नक्कीच वाढीस लागते. आजकाल लहान मुलांमध्ये देखील ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. त्यामुळे पालकवर्गात चिंतेची बाब निर्माण झाली आहे. थोडासा व्यायाम केला किंवा थोडीशी रनिंग केली तरी मुलांना दम लागतो. त्यामुळे मुलांच्या वाढत्या वजनाकडे वेळीच लक्ष देणे हे गरजेचे आहे.
मात्र, मुलांची वजन वाढीची समस्या ही काही कमी होत नाही. आम्ही आपल्याला आज असाच एक उपाय सांगणार आहोत. ज्याचे सेवन करून आपण आपले वाढते वजन हे नियंत्रणात ठेवू शकता. होय, आम्ही आपल्याला सांगत आहोत मोहरीच्या बीयाबाबत या बिया बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात.
मोहरीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे आपले कॅलरीचे प्रमाण हे कमी राहते आणि आपले वजन वाढत नाही. तसेच मोहरीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट तत्व असतात. यामुळे आपल्याला अल्झायमरसारखा त्रास देखील होत नाही. वजन घटवण्यासाठी आपण मोहरीच्या बिया रोज तीन ते चार चमचे खावे. यामुळे आपले वजन हे नियंत्रणात राहते.
आपले मेटाबोलिजम तंत्र देखील चांगल्या प्रकारे काम करते. तसेच आपल्याला नुसत्या मोहराच्या बिया खाण्यास अडचण होत असल्यास आपण सलाड सोबत देखिल या बिया खाऊ शकता. रोज सलाड घेऊन एक चमचा मोहरी च्या बिया खाव्या. त्यामुळे वजन नियंत्रणात राहील.
तसेच आपण याचे सेवन अंड्यासोबत देखील करू शकता. एका अंड्या सोबत दोन चमचे मोहरीच्या बिया खाव्यात. आपल्याला एका महिन्याभरात याचा नक्कीच फरक पडलेला दिसेल.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.