केसांच्या वाढीसाठी ते ‘या’ मोठ्या मोठ्या आजारांवर गुणकारी आहे मोहरी; जाणून घ्या फायदे

कोणत्याही पदार्थाची चव वाढवायची असेल तर त्यावर कडक तेलाची आणि मोहरीची फोडणी ही हवीच. तेलात तडतडलेल्या मोहरीची चव ही काही निराळीच असते.मोहरीमुळे पदार्थ उत्कृष्ट होण्यासोबतच त्याचे काही शारीरिक फायदेदेखील आहेत. स्वयंपाक घरात मोहरी ही सहज आढळून येते. मात्र, आपण कायम तिचा वापर फोडणीसाठी करतो. परंतु, मोहरी किंवा मोहरीचं तेल खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
१. कर्करोग टळण्यास मदत – मोहरीमुळे शरीरात कर्करोग सेल्स तयार होत नाहीत. त्यामुळे जेवणात मोहरीचा आवर्जुन वापर करावा. मोहरीच्या तेलामध्ये ग्लुकोसिनोलेट गुण असल्याने कर्करोग टळण्यास मदत होते.
२. त्वचेवरील मृत त्वचा दूर करण्यास मदत – मोहरीच्या बियांचा वापर नैसर्गिक स्क्रब म्हणूनही करता येतो. मोहरीच्या बियांमध्ये गुलाब पाण्याचे ३-४ थेंब टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते.
३. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी उपयुक्त – त्वचेला ग्लो आणायचा असेल तर मोहरीच्या बिया उपयुक्त ठरतात. मोहरीच्या बियांमध्ये सल्फर तसेच, अँटी फंगल हे घटक असतात. कोरडी त्वचा असल्यास त्यावर मोहरीच्या बिया या चांगला उपाय असल्याचं सांगण्यात येत. या बियांमुळे त्वचेवर होणाऱ्या इनफेक्शनला दूर ठेवण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम औषध आहे. मोहरीचे तेल, बेसन, दही आणि लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी धुवून टाका त्याने त्वचेचा रंग उजळल्यास मदत होईल.
४. दातदुखीपासून सुटका – मोहरीचे अनेक फायदे आहेत. त्यातील एक फायदा म्हणजे दातदुखीपासून सुटका. दात दुखत असतील तर मोहरीच्या तेलामध्ये थोडेसं मीठ मिसळून दिवसातून दोन वेळा या पेस्टने दात घासावेत.
५. केसांच्या वाढीसाठी लाभदायक – अनेक महिला केस गळतीमुळे किंवा लहान केस असल्यामुळे त्रस्त असतात. अशा समस्येमध्ये मोहरीचं तेल फायदेशीर ठरतं. मोहरीच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात बीटाकेरोटिन, आयरन, फॅटी अॅसिड, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असते. यामुळे केसांना नियमित मसाज केल्याने केस मजबूत होतात. मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ए असल्याने केसांची वाढ झपाट्याने होते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.