‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील सुमी आठवते? सध्याचे ‘हॉट’ फोटो पाहून ओळखण ही झालंय कठीण

‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील सुमी आठवते? सध्याचे ‘हॉट’ फोटो पाहून ओळखण ही झालंय कठीण

मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या अमृताला मिसेस मुख्यमंत्री या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याआधी अमृताने मिथुन या मराठी चित्रपटात देखील प्रमुख भूमिका केली होती.अमृताचे संपूर्ण नाव अमृता माणिकराव धोंडगे असे आहे. खरं तर अमृता हिने अभिनय क्षेत्रात येण्यास वडिलांचा विरोध होता.

पण तिच्या आईने मात्र तिला पाठिंबा दिला. त्यामुळे तिने आज या क्षेत्रात आपले यशस्वी अभिनेत्री म्हणून स्थान निर्माण केले आहे.अमृता ही अभिनयक्षेत्रात योगायोगाने आली आहे. तिला आधी इतर क्षेत्रात जाण्यासाठी तिच्या घरच्यांनी सांगितले होते. मात्र, या क्षेत्रात ती अचानक पडली आणि आणि तिला या मालिकेत काम मिळाले.

त्यामुळे ही घराघरात पोहोचली. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक अभिनेते व अभिनेत्री आहेत की ज्यांना मनोरंजन क्षेत्रात काम करायचे नव्हते. मात्र, तरीदेखील त्यांनी या क्षेत्रात येऊन नाव कमावले. अमृताने अभिनय क्षेत्रात येण्याचे ठरवले नव्हते.अमृताची डॉक्टर होण्याची इच्छा होती.अभिनेत्री नसते तर मी डॉक्टर झाले असते असे तिचे म्हणणे आहे.

अमृता ही एक पौराणिक भूमिका साकारताना देखील प्रेक्षकांना पहावयास मिळाली आहे.अमृता म्हणते की, मित्रांनी सांगितल्यामुळे तिने ऑडिशन दिले आणि तिची चित्रपटासाठी निवड झाली. पुढे मिसेस मुख्यमंत्री ही मालिका देखील तिला मिळाली. या मालिकेत सुमी ही भूमिका अमृताने साकारली आहे.

या मालिकेत सुमी ही मनाने श्रीमंत असुन एका गरीब घरातील मुलगी आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी सुमी ही अजिबात मागेपुढे पाहत नाही. अशा प्रकारचे व्यक्तीचित्रण सुमी या पात्रातून दाखवण्यात आले आहे. मालिकेत अमृता नॉन ग्लॅमरस भूमिकेत होती. आता चांगलीच ग्लॅमरस आहे.

अमृता ही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर ती नेहमीच फोटो शेअर करत असते. या फोटोंमधून तिचा ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाज आपणास पहावयास मिळतो.आज देखील असेच झाले आहे. अमृताने इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चहाते थक्क झाले आहेत.

या फोटोमध्ये अमृता फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसून येत आहे. अमृताने ब्रालेटड्रेस मधून सर्वांनाच घायाळ केले आहे. फोटोग्राफर अक्षय परांजपेने सुद्धा आपल्या पेजवर अमृताची काही फोटो शेअर केली आहेत.

Team Hou De Viral