पत्नीच्या निधनानंतर हा खतरनाक व्हिलन करतोय या मराठी मुलीला डेट, त्याच्यापेक्षा आहे 14 वर्षांनी लहान

पत्नीच्या निधनानंतर हा खतरनाक व्हिलन करतोय या मराठी मुलीला डेट, त्याच्यापेक्षा आहे 14 वर्षांनी लहान

मुग्धा गोडसे आणि राहुल देव गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. त्यांना अनेक सार्वजनिक कार्यक्रमात देखील एकत्र पाहाण्यात येते. एवढेच नव्हे तर त्यांच्या सोशल मीडियावर देखील ते एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. राहुल देवचे पहिले लग्न झाले असून त्याला एक मुलगा देखील आहे.

राहुलचे पहिले लग्न रिनासोबत झाले होते.रिनाचे 2009 मध्ये कर्करोगाने निधन झाले. रिनाच्या निधनानंतर त्यांच्या मुलाचा राहुलने एकट्यानेच सांभाळ केला. मुग्धा आणि राहुलने त्यांच्या नात्याविषयी कधीच मीडियापासून लपवले नाही. ते दोघे पॉवर कपल या कार्यक्रमात देखील झळकले होते.

राहुल आणि मुग्धा यांच्यात 14 वर्षांचे अंतर असून या गोष्टीची नेहमीच चर्चा मीडियात रंगते. पण याबाबत या दोघांनीही मौन राखणेच पसंत केले होते. पण आता पहिल्यांदाच राहुलने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल 51 वर्षांचा आहे तर मुग्धा त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांची पहिली भेट एका मित्राच्या लग्नात 2013 मध्ये झाली होती.

त्यांच्या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले आणि गेल्या पाच वर्षांपासून ते दोघे नात्यात आहेत. त्यांच्या नात्याविषयी राहुलने सांगितले आहे की, माझ्या आई-वडिलांमध्ये देखील दहा वर्षांचे अंतर होते. त्यामुळे माझ्यातील आणि मुग्धा मधील असलेल्या वयाच्या अंतराचा मी कधीही विचार करत नाही.

मुग्धा मुळची पुण्याची असली तरी मॉडलिंग या क्षेत्रात करियर करण्यासाठी ती मुंबईत शिफ्ट झाली. फॅशन या तिच्या पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंत ती ऑल द बेस्ट, जेल, हिरोईन, यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली तर राहुल देवने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

तसेच मराठी, भोजपुरी चित्रपटांमध्ये देखील तो झळकला आहे. बिग बॉस या प्रसिद्ध कार्यक्रमात देखील तो स्पर्धकाच्या भूमिकेत दिसला होता.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral