ही मराठमोळी अभिनेत्री ‘लग्न’ न करताच करत आहे या अभिनेत्या सोबत संसार ?

ही मराठमोळी अभिनेत्री ‘लग्न’ न करताच करत आहे या अभिनेत्या सोबत संसार ?

बॉलीवूडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचे प्रकार हल्ली खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात. आज आम्ही आपल्याला एका मराठमोळ्या अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत ही अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेते राहुल देव यांच्या सोबत लिव्ह इन मध्ये राहते.

राहुल देव याने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम यासारख्या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करून आपले अभिनयाचा डंका वाजवला आहे. राहुल देव सध्या 53 वर्षाचा आहे. राहूल देव याचा जन्म दिल्ली येथे झाला होता. दिल्लीमध्ये तो मोठा झाला. अभिनेक्षेत्रात करिअर होत असतानाच त्याने रीना देव तिच्यासोबत लग्न केले. 1998 मध्ये त्याचे लग्न झाले होते.

मात्र, दुर्दैवाने रीना हिचा 2009 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर तो खूपच खचून गेला. मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 2000 मध्ये आलेल्या चॅम्पियन या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर आशिक, अशोका, इंडियन, नरसिंह, अक्स यासारखे काही हिट चित्रपट त्याने केले. त्याचबरोबर तमिळ, तेलगू, कन्नड या भाषांमध्ये त्याने अनेक चित्रपट केले. दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये त्याला प्रचंड यश मिळाले.

आजही त्याच्याकडे अनेक चित्रपटाच्या ऑफर असल्याचे सांगण्यात येते. याप्रमाणेच राहुल देव याने टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये देखील आपला दबदबा निर्माण केला आहे. देवो के देव महादेव यासारखी मालिका त्याने गाजवून सोडली होती. 2013 मध्ये आलेल्या या मालिकेमध्ये त्याने अरुणासुराची भूमिका करून सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले होते.

त्याचबरोबर पावर कपल, सीआयडी, करो मरो, बिग बॉस 10, दिल बोले ओबेराय, दय अंपायर यासारखे शो देखील त्याने केले. त्यानंतर वेब सिरीज मध्ये देखील त्याने आपल्या कामाचा डंका बजावला. टेस्ट केस, हु इज युअर डॅडी, यासारख्या वेब सिरीज त्याने केल्या. आगामी काळातही त्याच्याकडे अनेक चित्रपट असल्याचे सांगण्यात येते.

राहुल देव याने नुकतीच एक मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देताना सांगितले की, मुलांचा आईविना सांभाळ करणे हे फार कठीण काम आहे. मी ज्यावेळेस माझ्या मुलाच्या शाळेत जातो, त्यावेळेस मी माझ्या आजूबाजूला अनेक मुलं पाहतो. त्यांच्या आई त्यांच्यासोबत आलेल्या असतात.

मात्र, माझ्या मुलासोबत मी एकटाच असतो. माझ्या मुलाला मी आई आणि बापाचे दोघांचे प्रेम देत आहे. मुलाला प्रेम देण्यासाठीच मी दुसरे लग्न काही केले नाही. एका कार्यक्रमामध्ये राहुल देव याची मुग्धा गोडसेच्या सोबत भेट झाली. मुग्धा गोडसे ही मराठीतील दिग्गज अशी अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.

राहुल देव आणि मुग्धा हे सध्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात. या दोघांनाही लग्नाची गरज वाटत नाही. राहुल आणि मुग्धा यांच्या वयामध्ये खूप अंतर आहे. याबाबत मुग्धा हिला विचारले असता तिने सांगितले की, आमचे नाते खूप चांगले आहे. आमचे विचार खूप जुळतात. त्यामुळे आम्हाला लग्न करण्याची गरज वाटत नाही. आम्ही त्यामुळेच एकत्र राहतो.

राहुल देव हे अतिशय चांगले असे अभिनेते आहेत, असेही मुग्धाने सांगितले.

Team Hou De Viral