‘सा रे ग म लिटिल चॅम्प’ फेम या ‘गायिकेने’ घेतली नवी कार

सा रे ग म लिटिल चॅम्प’ फेम मुग्धा वैशंपायनने घेतली नवी कार
सोशल मीडिया असो किंवा एखादा रिअॅलिटी शो सध्याच्या घडीला प्रसिद्धी मिळवण्याचं हे एक उत्तम माध्यम झालं आहे.परंतु, प्रसिद्धी मिळवल्यानंतरही ती लोकप्रियता कायम राखून ठेवणं हे खरं कौशल्य आहे. विशेष म्हणजे ही लोकप्रियता जपून ठेवण्यास यशस्वी ठरली ती म्हणजे प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन.
‘सा रे ग म लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचली मुग्धा वैशंपायन आजही लोकप्रिय गायिकांपैकी एक असल्याचं दिसून येतं. सोशल मीडियावर सक्रीय असलेली मुग्धा अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मुग्धाने नुकतीच एक नवीन गाडी घेतली आहे. ‘Welcoming our new #babyelephant’ असं कॅप्शन देत मुग्धानं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सध्या सोशल मीडियावर मुग्धाच्या या पोस्टची चर्चा सुरु आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये सुयश टिळक, कार्तिकी गायकवाड, अवधूत गुप्ते अशा अनेक कलारांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील मुग्धाने ‘सा रे ग म लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमात आपल्या आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः मोहून टाकले होते.
मुग्धा शास्त्रीय संगीतामध्ये सध्या करिअर करत असल्याचं सांगण्यात येतं. दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण अलिबाग येथे घेणारी मुग्धा पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती. मुग्धाने दहावीच्या परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर विज्ञान विषयाची आवड असल्याने तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता.
पुढच्या शिक्षणासाठी नंतर ती मुंबईत आली. मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण केलं आहे. मुग्धाचं ‘मुग्धा वैशंपायन ऑफिशियल’ हे युट्यूब चॅनेलदेखील आहे. मुग्धाला ट्रेकिंग, स्विमिंग आणि सायकलिंग करण्याची आवड आहे. मुग्धाला साडी नेसण्याची विशेष आवड असल्याचं दिसून येतं.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.