‘… तर ती धंदा करणारी आहे’, प्रसिद्ध अभिनेत्याचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य

‘… तर ती धंदा करणारी आहे’, प्रसिद्ध अभिनेत्याचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य

एखादा व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात आला की नंतर तो काहीही बोलून अनेकांच्या टीका आपल्याकडे ओढवून घेतो. यामध्ये हल्लीचे उदाहरण द्यायचे झाले, तर मुकेश खन्ना यांचे देता येईल. मुकेश खन्ना यांनी सध्या एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते खूपच चर्चेत आले आहेत, तर अलीकडच्या काळामध्ये कंगना राणावत ही अभिनेत्री देखील कायम वादातच असते.

अनेकांवर टीका करून ती अनेकांचे मनोरंजन करते आणि स्वत: ट्रोलिग चा सामना देखील करते. कंगना राणावत ही अतिशय भडक वक्तव्य करत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसत आहे, तर अनेक कलाकार देखील आपले मत व्यक्त करताना समाज मनाचे भान पाहत नाहीत आणि टीकेचे धनी बनतात.

आता मुकेश खन्ना देखील असेच एक वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आले आहेत. काही वर्षांपूर्वी शक्तिमान या मालिकेतून घराघरात पोहोचलेले मुकेश खन्ना हे सर्वांच्या मनात आदराचे स्थान होते. मात्र, आता त्यांच्या वक्तव्यानंतर ते टिकेचा सामना करत आहेत.

शक्तिमान या मालिकेतून काही वर्षांपूर्वी घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना आता चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये असे काही ते बोललेत की त्यानंतर त्यांच्यावर अनेकजण टीका करताना दिसत आहेत. मुकेश खन्ना यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

नेमक ते काय बोलले चला जाणून घेऊया. मुकेश खन्ना म्हणाले की, एखादी मुलगी एखाद्या मुलाला स्वतःहून शरीरसंबंधासाठी विचारत असेल, तर ती मुलगी वेश्या असावी. ती मुलगी नाही तर ती धंदा करणारी तरुणी आहे, अशा निर्लज्जपणाच्या गोष्टी सभ्य समाजातील कोणतीही मुलगी करणार नाही, असे ती म्हणाली. असं करणं हा तिचा व्यवसाय आहे. यात तुम्ही सहभागी होऊ नका, असे मुकेश खन्ना यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

मात्र, आता त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. किमान स्त्री शक्तीचा तरी मान ठेवायला हवा होता, असे एका चाहत्याने म्हटले आहे, तर माफ कर शक्तिमान. पण यावेळी तू चुकलास, असे देखील एकाने म्हटले आहे. जेव्हा शक्ती आणि मान दोन्ही गोष्टी माणसाला जोडून जातात तेव्हा तू असं बोलू शकतो, असे देखील एकाने म्हटले आहे.

शक्तिमान म्हातारपणी काहीही बरळत आहे, असेही एकाने म्हटले आहे, तर एक जण म्हटला आहे की, शक्तिमान आता म्हातारा झाला आहे. त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. आमच्या मनात तुझ्याविषयी खूप आदर होता. मात्र, आता तू तो आदर घालून टाकला आहेस, असे देखील अनेकांनी म्हटले आहे.

तर आपण शक्तिमान म्हणजेच मुकेश खन्ना यांच्या मताशी सहमत आहात का? आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral