… म्हणून व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील लोक मुंडन करतात ? जाणून घ्या त्यामागचे कारण

… म्हणून व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील लोक मुंडन करतात ? जाणून घ्या त्यामागचे कारण

एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला की त्याचा मृत्यू हा होणारच. हे या भूतलावरचा सत्य आहे. मात्र मृत्युचे नाव काढल्यानंतर अनेकांना भीती वाटत असते. अनेक लोक मृत्यूचे नाव ऐकूनच अनेक लोक हे एखाद्या व्यक्तीचा किंवा आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला स्मशानभूमीत घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करतात.

मात्र, स्वतःच्या मृत्यूबाबत बोलण्यासही ते टाळतात, असे का होत असेल. जो व्यक्ती स्वतःच्या मरणाला भीत नाही त्या व्यक्तीला कशाचीही भीती नसते, असे समजले जाते. कारण निडर होऊनच जगले तरच जीवनाचा अर्थ खरा अर्थ असतो. मात्र, काही लोक आयुष्यभर घाबरत असतात. त्यामुळे त्यांना कसे जगावे, हेच कळत नाही.

त्यामुळे छोटेसे हे आयुष्य आहे, ते आपण चांगल्या पद्धतीने जगल पाहिजे, असे देखील सांगण्यात आलेले आहे. गरुड पुराणामध्ये माणसाच्या मृत्यूनंतरचे सर्व शास्त्र हे सांगितलेले आहे. यामध्ये सगळे संस्कार देखील सांगितलेले आहेत. संस्कार काय असतो, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर स्मशानभूमीतून बाहेर येताना मागे वळून पाहायचे नाही, असे देखील यामध्ये सांगण्यात आलेले आहे.

त्याच प्रमाणे इतर गोष्टी देखील यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. मृत्यूनंतर मृ ता ला आंघोळ किंवा नवीन कपडा का घालतात? याबाबतही यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आज आम्ही आपल्याला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर केस कापतात याबद्दल माहिती देणार आहोत.

1) स्वच्छता – एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर केस कापणेमागचे कारण हे स्वच्छता आहे, आहे असेही गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे. कारण की आपण स्मशानभूमीत सगळीकडे वावरत असतो. त्यामुळे आपल्याला इतर आजार जडू शकतात. त्यामुळे देखील केस कापतात.

2) भावना – आपल्या घरातील एखादा व्यक्ती गेला असेल तर त्या व्यक्तीच्या श्रद्धेपोटी किंवा तो जवळचा असतो. त्यामुळे देखील कुटुंबातील सगळे लोक आपल्या डोक्यावरील केस हे कापत असतात.

3) आत्मा – एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याचा आत्मा पहिले शरीराच्या आसपास भटकतो त्याचप्रमाणे मग कुटुंबियांच्या आजूबाजूला तो फिरतो. अशा वेळेस जर घरातील लोकांच्या डोक्यावर केस असतील तर तो केसाच्या माध्यमातून अतृप्त रहातो, असे सांगण्यात येते. त्यामुळे देखील डोक्यावरील केस कापावे लागतात, असे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे.

Team Hou De Viral