गुणवर्धक नाचणीचा आहारात समावेश केल्याने आपल्याला होतात ‘हे’ फायदे !

नाचणी ही पचायला एकदम हलकी असते. आजारातून बरे झालेल्यांसाठी तर एकदम उत्तम असते. नाचणी खाऊन पोटाच्या तक्रारी होत नाहीत. नाचणी पित्तशामक, थंड, रक्तदोष कमी करणारी आहे. नाचणी सत्व किंवा दुध साखर टाकून केलेली खीर लहान बाळ किंवा वयस्कर व्यक्तींसाठी उत्तम आहार आहे.
भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवली जाते. नाचणीला काही भागात नागली, रागी किंवा फिंगर मिलेट असे देखील म्हणतात. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकारानं मोहरीसारखे बारीक असतात. नाचणीमध्ये कॅ ल्शिअम आणि फॉ स्फरसचे प्रमाण भरपूर आहे.
नाचणी खाण्याचे फायदे
1. हाडांसाठी एकदम फायदेशीर – सध्या आपण सर्वत्र ऐकतो ते म्हणजे हाडांच्या तक्रारी उदा. गुडघे दुःखी, हाडांचा ठिसूळपणा जास्त प्रमाणात आढळुन येतो. हाडांचा अशक्तपणा, हाडं ठिसूळ होणं, हाडं खिळखिळी होणं हे आजार आजकाल दर दहा जणांपैकी एकामध्ये आढळतात. हाडांचे आजार असणाऱ्यांना आहारात “नाचणी’ शिवाय दुसरा पर्याय नाही.
2. लहान मुलांसाठी गुणकारी – मुलांना गूळ आणि गाईच्या तुपापासून बनवलेला नाचणी हलवा घ्यावा. नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळे मुलांची पचनशक्ती सुधारते.
3. आपल्या वजनावर नियंत्रण राहते – तांदळाच्या पदार्थाऐवजी नाचणीपासून बनलेले पदार्थ खावेत. नाचणी पचायला हलकी असते. नाचणीमुळे शरीराला फक्त ऊर्जाच मिळत नाही, तर अमिनो ऍसिड मिळते. वजनावर नियंत्रण होणार तसेच भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवले जाते.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.