मुलाच्या नाकातून येत होता विचित्र वास; सर्जरीनंतर डॉक्टरही शॉक..

काही जणांना नाकातून दुर्गंध येतो पण तो फक्त त्यांनाच जाणवतो. पण एका 16 वर्षांच्या मुलाच्या बाबती मात्र विचित्रच होतं. या मुलाच्या नाकातून येणाऱ्या दुर्गंध संपूर्ण खोलीभर पसरत होता. त्यालाच नाही तर त्याच्या आजूबाजूतच्या सर्वांपर्यंत हा घाणेरडा वास पोहोचत होता.
आपल्याला श्वासात काही समस्या नाही याची खात्री या मुलाला होती. पण मग या दुर्गंधीचं नेमकं कारण काय हे शोधण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या काही तपासण्या केल्या आणि त्यांना धक्काच बसला. मुलाला नाकाची समस्या उद्भवू लागल्यानंतर त्याला त्याच्या पालकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं त्याच्या काही तपासण्या झाल्या. त्याच्या नाकाची इंडोस्कोपीद्वारे तपासणी करण्यात आली.
तेव्हा त्याला रबिनेट हायपरट्रॉफी झाल्याचं समजलं. टरबिनेट्स हा नाकातील एक भाग आहे, तिथं सूज आली होती. सामान्यपणे बदलत्या वातावरणानुसार होणाऱ्या अॅलर्जीमुळे कंवा सायनसमुळे असं होतं, असं तज्ज्ञ सांगतात. डॉक्टरांनी मग त्याला एक स्प्रे आणि अँटिहिस्टामिन औषध दिलं आणि चार ते सहा आठवड्यांनी पुन्हा यायला सांगितलं. पण मुलगा परत गेला तो एक वर्षांनी.
वर्षभर त्याच्या नाकातून दुर्गंधीयुक्त स्राव येतच होता. ज्याचा वास फक्त त्यालाच नाही तर अख्ख्या खोलीभर पसरत होता. तेव्हा डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं तर त्याच्या नाकात काहीतरी गोलाकार असल्याचं आढळलं. अखेर डॉक्टरांनी त्याच्या नाकाची सर्जरी करण्याचं ठरवलं. तेव्हा त्याच्या नाकातून चक्क बीबी पॅलेट म्हणजे बंदुकीची गोळी बाहेर आली.
त्याच्या कुटुंबाशी बोलल्यानंतर डॉक्टरांना समजलं की जेव्हा तो आठ-नऊ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या नाकाला बंदुकीची गोळी लागली होती. पण तेव्हा काही लक्षणं दिसली नाहीत म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखवलं नाही. द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे मेडिकल स्टुडंट डायलन जेड इरविन यांनी सांगितलं, बाहेरील एखादा घटक नाकात गेला तर यामुळे नाकातून दुर्गंध येऊ शकतो.
कारण यामुळे नाकातील स्राव बाहेर येण्याचा मार्ग रोखला जातो. ज्यामुळे म्युकसमध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि मग दुर्गंधी येते. या मुलाच्या नाकातील गोळी लवकरच दिसली नाही कारण त्यावर पूर्णपणे टिश्यू वाढले होते. शिवाय त्याच्या नाकावरही काही जखम नव्हती.
खूप वर्षापूर्वी त्याच्या नाकात ही गोळी गेली होती इतका कालावधी नाकात गोळी राहिली तर उपचारात गुंतागुंत उद्धवू शकते, इन्फेक्शन वाढतं आणि ते जबडा आणि डोळ्यांपर्यंतही पोहोचू शकतं, हाडांना नुकसान पोहोचू शकत होतं, रुग्णाला श्वास घ्यायला त्रास झाल्यानं जोरजोरात श्वास घेऊन गोळी गळ्यापर्यंतही जाऊ शकते. सुदैवानं या मुलाच्या बाबतीत अशी काही परिस्थिती नव्हती.
सर्जरीनंतर त्याच्या नाकातील टिश्यू सामान्य झाले आणि आता त्याच्या नाकातील दुर्गंधीही गेली. या मुलाचं प्रकरणाबाबत जामा ओटोलॅरिंजोलॉजी हेड अँड नेक सर्जरीमध्ये या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. लाइव्ह सायन्सनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.