काही महिन्यांपूर्वी बंद झालेली ही लोकप्रिय मराठी मालिका पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला

काही महिन्यांपूर्वी बंद झालेली ही लोकप्रिय मराठी मालिका पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला

मालिका विश्वामध्ये सध्या अनेक मालिका या सुरू होत आहेत, बंद होत आहेत, तर काही मालिका या पुन्हा एकदा दाखवण्यात येत आहेत. फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आता बंद होणार असली तरी ती पुनप्रक्षेपित करण्यात येणार आहे.

संध्याकाळी पाच ते सहा वेळेत ही मालिका दाखवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचप्रमाणे आणखीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका देखील काही महिन्यांपूर्वी बंद झाली होती. मात्र, या मालिकेमध्ये आपल्याला आदेश बांदेकरांचा मुलगा देखील दिसणार आहे. याबद्दलच आपण जाणून घेऊया.

मराठी चित्रपटसृष्टी तसेच नाटकांमध्ये देखील अनेक अभिनेता आणि अभिनेत्री हे काम करत असतात. अनेकदा अनेकांना ही माहिती नसते की, बाप आणि त्याचा मुलगा चित्रपटात एकत्र काम करत असतो. मात्र, अनेकांना त्याचा पत्ताच लागत नाही. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये विजय गोखले यांचा मोठा बोलबाला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून ते क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, तर आता त्यांचा मुलगा देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाताना दिसत आहे. त्यांच्या मुलाचे नाव आशुतोष गोखले असे आहे. आशुतोष हा देखील मराठी चित्रपट सृष्टीमधील आघाडीचा अभिनेता असून सध्या तो रंग माझा वेगळा या मालिकेत दिसत आहे.

मंदार जाधव सुद्धा आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये दिसत आहे. मंदार याचे वडील सुभाष जाधव आहेत. सुभाष जाधव देखील खूप लोकप्रिय आहेत. सुभाष जाधव यांनी देखील अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे. आदेश बांदेकर यांनी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक चित्रपट मालिका नाटक देखील केले आहे. अजित बांदेकर सध्या शिवसेनेचे नेते देखील आहेत.

सोहम हा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर नवे लक्ष या मालिकेत आपल्याला दिसत आहे. तर आदेश बांदेकर गेल्या अनेक वर्षापासून होम मिनिस्टर हा सूत्रसंचालन करत आहेत. तर आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव लक्ष ही मालिका पुन्हा एकदा सुरू होणार आहे. याबाबत त्याने आपल्या चाहत्यांना तसे संकेत दिले आहेत.

आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा देखील चित्रपटसृष्टीशी कार्यरत आहे. सोहम बांदेकर हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. आता देखील सोहम बांदेकर याला एका त्याच्या चहात्याने विचारले की, पुन्हा एकदा तू मालिकेत कधी दिसणार त्यावर त्याने लवकरच आपण मालिकेत दिसू असे सांगितले.

नव लक्ष ही मालिका पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे संकेत त्याने दिले आहेत. त्यामुळे ही जुनीच मालिका पुन्हा नव्याने सुरू होणार आहे, असे म्हटले आहे.

Team Hou De Viral