सुरू होतेय आणखी एक नवी मालिका, ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

सुरू होतेय आणखी एक नवी मालिका, ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

सोनी मराठीवर ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, ही मालिका लवकर संपत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे.

14 मार्चपासून या मालिकेच्या जागी दुसरी मालिका सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनही बरसात आहे या मालिकेमध्ये मुक्ता बर्वे, उमेश कामत यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. ही मालिका लोकप्रिय ठरत असताना ही मालिका बंद का होते, असा सवाल देखील अनेक जण करत आहेत.

पण जर आपण इतिहास पाहिला असेल, तर दर्जेदार मालिका या अल्पावधीत संपतात, असे दिसते. या आधी देखील घना आणि राधा यांची जोडी असलेली ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका देखील अल्पावधीतच संपली होती. यामुळेच आता अजूनही बरसात आहे ही मालिका बंद करण्याचा निर्णय दिग्दर्शकांनी घेतला आहे.

या मालिकेच्या जागी दुसरी नवी मालिका सुरू होणार आहे. आज आम्ही या मालिकेबद्दल माहिती देणार आहोत. काही वर्षांपूर्वी श्रीयुत गंगाधर टिपरे ही दिलीप प्रभावळकर यांची मालिका आपल्याला आठवत असेल. ही मालिका प्रेक्षकांची खूप आवडत होती. दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदीनी या कादंबरीवर आधारित ही मालिका होती.

या मालिकेमध्ये शिऱ्या, शलाका आबा यांच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. शुभांगी गोखले यांच्यासह राजन भिसे यांनी या मालिकेत काम केले. शिरीष कदम हा देखील या मालिकेत दिसत होता. याचबरोबर इतर काही अशा मालिका आहेत की अल्पावधीतच संपल्या होत्या. मालिकांमध्ये रटाळपणा आणला की प्रेक्षकांना तो अजिबात आवडत नाही.

याचा प्रत्यय अनेकांना आलेला आहे. त्यामुळे अनेक मालिका बंद करा, असे म्हणतात. आता आई कुठे काय करते ही मालिका देखील याच वळणावर जात आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील संतापलेले आहेत आणि ही मालिका लवकर बंद करण्यात यावी, अशी मागणी करत आहे.

आता अजूनही बरसात आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेच्या जागी आपल्याला आता ‘सुंदर माझे घर’ ही मालिका दिसणार आहे. ही मालिका 14 मार्च रोजी रात्री 8 वाजता सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मालिकेचे प्रोमो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

प्रोमोवरून तरी ही मालिका चांगली असेल, असे संकेत मिळत आहेत. कारण या मालिकेमध्ये अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची मुख्य भूमिका असणार आहे. सासू आणि सुनेचे नाटक या मालिकेत दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. उषा नाडकर्णी यांच्यासोबतच या मालिकेमध्ये सुकन्या कुलकर्णी यादेखील दिसणार आहेत.

संचिता कुलकर्णी याही या मालिकेत दिसणार आहेत. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे. या मालिकेबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक असल्याचे सांगण्यात येते.

Team Hou De Viral