‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेत मोठा बदल ! तेजश्री प्रधानच्या जागी आता दिसणार ‘ही’ नवी अभिनेत्री

‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेत मोठा बदल ! तेजश्री प्रधानच्या जागी आता दिसणार ‘ही’ नवी अभिनेत्री

मालिकांमधील तोच तोच एकसारखेपणा टाळत ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने एक नवा प्रयोग छोट्या पडद्यावर केला. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वीदेखील झाला. त्यामुळेच या मालिकेची आज अफाट लोकप्रियता पाहायला मिळते. दरवेळी सासू-सुनेचं भांडण असणारी मालिका साऱ्यांनीच पाहिली.

परंतु, या मालिकेत सासूला पाठिंबा देणारी सून पाहायला मिळाली. अभिनेत्री तेजश्री प्रधानने शुभ्रा या भूमिकेला विशेष न्याय दिला. परंतु, आता या मालिकेत तेजश्रीऐवजी एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे.’अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत आता अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.

यातला मोठ्ठा बदल म्हणजे आसावरीमधील आत्मविश्वास वाढला असून ती एका मोठ्या कंपनीची मालकीन झाली आहे. तर अभिजीत राजे स्वखुशीने घर सांभाळायला सज्ज झाले आहेत. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आणि या मालिकेत झालेले बदल प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

‘अग्गंबाई सूनबाई’ हा ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचा नवा सीजन आहे.प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये तेजश्रीच्या जागी एक नवी अभिनेत्री शुभ्राच्या रुपात प्रेक्षकांसमोर आली. त्यामुळे ही नवीन अभिनेत्री कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. यापुढे शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर साकारणार आहे.

दरम्यान, अग्गंबाई सासूबाईच्या जागी आता ‘अग्गंबाई सूनबाई’ या नावाने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात अनेक बदल झाले आहेत. विशेष म्हणजे शुभ्रादेखील एका बाळाची आई झाली आहे. त्यामुळे आता या मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral