रामदेव बाबाच्या आश्रमात या मराठी आमदाराच्या प्रेमात पडल्या होत्या ‘या’ खासदार, चित्रपटात तसेच मॉडेलिंग मध्ये केली होती करिअरला सुरुवात

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली. त्यानंतर एकच चर्चेला उधाण देखील आले. हा मुद्दा संसदेपर्यंत देखील पोहोचला. या प्रकरणात अनेक असे पैलू आहेत. त्यानंतर फोन टॅपिंगचा मुद्दा देखील आता चर्चेत आहे.
सचिन वझे हा मुद्दा संसदेत पोहोचल्यानंतर या प्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी संसदेत आवाज उठवला आणि राज्य सरकार कशाप्रकारे काम करत आहे, याबाबत माहिती दिली. हे सरकार बरखास्त करावे, अशी त्यांनी मागणी केली. त्यानंतर त्यांनी ही मागणी करताच शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रतिउत्तर त्यांना दिले.
तसेच ‘तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते मी पाहतोच ‘,असे देखील सावंत यांनी मला उद्देशून म्हटल्याचे राणा याने लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.नवनीत राणा नेमक्या कोण आहेत याबाबत अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष तिकिटावर निवडणूक लढविली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देखील दिला होता. मात्र, कालांतराने त्या भाजपच्या समर्थक बनल्या असे देखील सांगण्यात येते.
आता सचिन वझे आणि अरविंद सावंत यांच्या प्रकरणानंतर राणा चांगल्याच चर्चेत आलेल्या आहेत. 2011 मध्ये त्यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्या सोबत लग्न केले. त्यानंतर त्या थेट राजकारणात उतरल्या आणि एकदम चर्चेत आल्या. आपली देहबोली आणि बोलण्याच्या लगबगीने त्या सर्वांना मोहून टाकत असतात.
बाबा रामदेव यांच्या आश्रमात झाली भेट
नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट बाबा रामदेव यांच्या आश्रमात झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर 2011 मध्ये 2 फेब्रुवारी रोजी दोघांनी एका सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न केले होते.
या विवाह सोहळ्यामध्ये जवळपास तीन हजार जणांनी लग्न केले होते. त्यावेळेस रवी राणा यांनी लग्न केले त्यावेळेस ते आमदार होते. त्यामुळे हा लग्नसोहळा राज्याच्या राजकारणात चर्चेत आला होता. या सोहळ्याला पृथ्वीराज चव्हाण, बाबा रामदेव तसेच विवेक ओबेराय यांनी देखील हजेरी लावली होती.
पाच भाषा येतात नवनीत राणा यांना
नवनीत राणा यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1986 रोजी मुंबई झालेला आहे. त्यांना मराठी सोबतच पंजाबी तेलगू, हिंदी आणि इंग्लिश भाषा बोलता येतात. बारावी नंतर त्यांनी मॉडेलिंगमध्ये आपले करियर करण्यास सुरुवात केली.सुरुवातीला त्यांनी अनेक म्युझिक अल्बम मध्ये काम केले.त्यानंतर त्यांना कन्नड चित्रपटात काम मिळाले. दर्शन हा त्यांनी पहिला चित्रपट तिकडे केला. यासोबतच त्यांनी तामीळ आणि तेलगू चित्रपटात देखील काम केल्याचे सांगण्यात येते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.