‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील नवीन ‘देवकी’चा नवरा देखील आहे प्रसिद्ध अभिनेता

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील नवीन ‘देवकी’चा नवरा देखील आहे प्रसिद्ध अभिनेता

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास यशस्वी ठरली आहे. या मालिकेमध्ये अनेक अभिनेता व अभिनेत्री झळकले आहेत. वर्षा उसगावकर यांनी या मालिकेमध्ये अनेक वर्षानंतर काम केले आहे. महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.

या मालिकेमध्ये जयदीप गौरी यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. आता मालिकेमध्ये वेगळे वळण आल्याचे आपण पहात आहोत. मालिकेमध्ये जयदीप याचे लग्न झाल्याचे आपल्याला दिसत आहे. मात्र त्याच्या जागी दुसरा कोणीतरी लग्न करतो, असे कथानक आता आपण पाहणार आहोत. तर या मालिकेमध्ये मीनाक्षी राठोड ही देखील आपल्या दिसली आहे.

मीनाक्षी हिने या मालिकेमध्ये देवकीची अत्यंत खुमासदार भूमिका साकारली. आता मीनाक्षी राठोड ही बाळंतपणामुळे या मालिकेत दिसत नाही. मीनाक्षी राठोडचा पती कैलास वाघमारे हा देखील एक अभिनेता आहे. आता मीनाक्षी राठोडच्या जागी भक्ती रत्नपारखी ही अभिनेत्री देवकी ची भूमिका साकारीत आहे.

तर आता या मालिकेमध्ये देवकी म्हणजे मीनाक्षी राठोडच्या जागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी ही दिसत आहे. भक्ती रत्नपारखीने काही दिवसांपूर्वी अगं बाई सासुबाई या मालिकेमध्ये मॅडची भूमिका साकारली होती. आता तिची किती दिवसासाठी या मालिकेमध्ये निवड करण्यात आली आहे, हे अद्याप सांगण्यात आले नाही.

मात्र, काही दिवसासाठी या मालिकेत दिसेल, असे सांगण्यात येत आहे. या आधी भक्तीने अगं बाई सासुबाई, कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. अक्षय कुमार, परेश रावल यांच्या सोबत ओ माय गॉड या चित्रपटात तिने काम केले होते. सी कंपनी, देऊळ या सारख्या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला होता.

आता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये देखील तिने अतिशय लोकप्रिय अशा पद्धतीने काम केले असून प्रेक्षकांच्या मनात देखील घर केले आहे. भक्ती रत्नपारखीचे पती देखील दिग्गज अभिनेते आहेत. भक्ती रत्नपारखी यांच्या पतीचे नाव निखिल रत्नपारखी असे आहे.

निखिल रत्नपारखी यांनी अनेक हिंदी, मराठी मालिका चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते अनेकदा कॉमेडी शो मध्ये देखील आपल्याला दिसत असतात. आपल्या विनोदी ढंगाने केलेल्या अभिनेते सगळ्यांनाच हसवतात. सलमान खान सोबत देखील त्यांनी काम केले आहे.

तर आपल्याला निखिल रत्नपारखी भक्ती रत्नपारखी यांची जोडी आवडते काय ते आम्हाला सांगा.

Team Hou De Viral