गर्दीने खच्च भरलेल्या लोकलमधून बॉलिवूड स्टारचा प्रवास; कोणीच ओळखलंही नाही

गर्दीने खच्च भरलेल्या लोकलमधून बॉलिवूड स्टारचा प्रवास; कोणीच ओळखलंही नाही

बॉलिवूडमध्ये काही कलावंत असे आहेत की ज्यांनी अतिशय कष्टामध्ये आपले जीवन घातलेले आहे. त्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये यश मिळवले आहे. मुंबईत राहणारे अनेक कलाकार यांनी सुरुवातीच्या काळामध्ये लोकलमध्ये प्रवास केलेला आहे.

मात्र काही कलाकार असे आहेत की, ज्यांनी लोकलची पायरी देखील कधीच चढली नाही. कारण की त्यांना अशी वेळच कधी आल्याचे पाहायला मिळाले नाही. कारण की ते कलाकार बॉलिवूडमधील दिग्गज घराण्यातून आले असावेत, आता एका दिग्गज अभिनेत्याने लोकल ट्रेनमधून प्रवास केला आहे.

त्या वेळेस ट्रेनमध्ये खचाखच गर्दी भरलेली होती. हा कलाकार देखील अतिशय गरीब परिस्थितीतून वर आला आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत. काही वर्षांपूर्वी मराठी मध्ये डोंबिवली फास्ट नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये संदीप कुलकर्णी यांनी अतिशय अप्रतिम भूमिका साकारली होती.

चित्रपटाचे नाव डोंबिवली फास्ट असले तरी या चित्रपटांमध्ये एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणींचा सामना दाखवण्यात आला होता. त्यावरून लोकलचे महत्त्व देखील विशद करण्यात आले होते. मुंबईकरांची प्राणवाहिनी म्हणून लोकलकडे पाहिले जाते. लोकल नसेल तर मुंबईकरांचा प्रवास हा अतिशय कटकटीचा होतो.

कोरोना काळामध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून लोकल ट्रेन बंद होत्या. त्यामुळे अनेक मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आता लोकल ट्रेन या सुरू झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मुंबईकरांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

बॉलीवूडमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. काही वर्षापूर्वी त्याचा मांझी द माउंटेन मॅन हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये राधिका आपटे हिने देखील भूमिका केली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात त्याच्या अभिनयाचे कौतुक प्रचंड करण्यात आली होते.

नवाजुद्दीन सिद्दिकी हा गरीबीतून वर आलेला आहे. बॉलीवूड मध्ये त्याने आपले एक नाव कमावले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याने मुंबईमध्ये नुकताच एक आलिशान बंगला बांधला आहे. बंगल्याला त्याने नवाब नाव दिले आहे. हे नाव त्याच्या वडिलांचे असल्याचे सांगण्यात येते.

नवाजुद्दीन सिद्दिकी सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी जाणला जातो. आतादेखील नवाजुद्दीन सिद्दीकी हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने चक्क लोकलमधून प्रवास केला आहे व आपल्याला खरे वाटत नसेल. मात्र, त्याने असा प्रवास केला आहे. एक दिवस तो मुंबईतील एका लोकल प्लॅटफॉर्मवर आला.

गर्दीने खचाखच भरलेल्या डब्यामध्ये तो फर्स्टक्लास डब्यांमध्ये बसला. त्याने पूर्ण प्रवासही केला. मात्र, अखेरपर्यंत कुणालाच कळलं नाही. की हा बॉलीवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आहे. त्याचा अभिनय पाहून अनेकांनी त्याला दाद दिली आहे. मात्र, त्याला ओळखता कोणालाही आले नाही.

नवाजुद्दीन सिद्दीकी याने लोकल ट्रेनमधून प्रवास केला. याचे उत्तर मात्र काही कळू शकले नाही. मात्र एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी त्याने प्रवास केला असावा. देखील अनेकांनी म्हटले आहे. ज्यावेळेस त्याने प्रवास केला. त्यावेळेस त्याच्या तोंडावर मास्क व डोळ्यावर काळा रंगाचा गॉगल आणि मरून रंगाचा टीशर्ट असा पोशाष होता.

त्यामुळे शेजारी असणाऱ्या व्यक्तीने त्याला ओळखले नाही, तर आपल्याला या बद्दल काय वाटते ते सांगा.

Team Hou De Viral