मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली! या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली! या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

गेल्या दोन वर्षापासून अनेक दिग्गज कलाकारांना आपण गमावले आहे. कोरोना महामारीनंतर याचे प्रमाण हे अधिक वाढलेले आहे. काही कलाकारांचे निधन या आजाराने झाले, तर काही जणांना वेगळ्या आजाराने ग्रासले होते. काही महिन्यांपूर्वीच बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नदीम-श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.

श्रावण राठोड हे कुंभमेळ्यासाठी गेले होते. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह मुंबईत परतले. मुंबईत परत आल्यानंतर त्यांना त्रास जाणवला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याबरोबर बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर हे देखील कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्यांचे देखील गेल्या वर्षी निधन झाले.

याचबरोबर बॉलीवूडचे ट्रॅजेडी किंग मानले जाणारे दिलीप कुमार यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. बॉलिवूडचा मल्टी टॅलेंटेड अभिनेता इरफान खान याचे देखील गेल्या वर्षी कॅन्सर सारख्या आजाराने निधन झाले होते. मराठी चित्रपट सृष्टीला देखील याचा खूप मोठा फटका बसलेला आहे. मराठी चित्रपट सृष्टीने देखील अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. यामध्ये काही अभिनेता व अभिनेत्री यांचा देखील समावेश आहे.

अभिनेत्री नयना मुके हिला आपण ओळखत असलाच नयना मुके हिने आजवर अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केलेले आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्याच्या आधी तिने खूप स्ट्रगल केले आहे. सुरुवातीला काही जाहिरातीमधून तिने काम केले. त्यानंतर तिने मॉडलिंग देखील केले. आता ती मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चांगल्यापैकी रुळली आहे.

नयना मुके हिने गणपती बाप्पा मोरया या मालिकेमध्ये महालक्ष्मीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. ही भूमिका अजरामर ठरली. याच बरोबर तिने फायनल डिसिजन यामध्येही काम केले. तिची ही भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. नयना मुके हिच्या वडिलांचे काही दिवसापूर्वीच निधन झाले.

याबाबत नयना मुके हिने भाऊक पोस्ट करताना आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये नयना म्हणते की, पप्पा तुम्हाला जाऊन एक महिना झाला. तुम्ही अजूनही माझ्या आठवणीमध्ये आहात. मी जे क्षेत्र निवडले, त्यामध्ये तुम्ही मला कायम पाठिंबा दिला. आपली आठवण कायमच येत राहील. “मिस यु पप्पा” अशी पोस्ट तिने ने केली आहे.

Team Hou De Viral