नेहा कक्करला रक्षाबंधनला मिळाली एवढी मोठी ‘ओवाळणी’, मात्र तिने भाऊ टोनी कक्करला दिली दुप्पट रक्कम

नेहा कक्करला रक्षाबंधनला मिळाली एवढी मोठी ‘ओवाळणी’, मात्र तिने भाऊ टोनी कक्करला दिली दुप्पट रक्कम

आताच्या घडीला श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणात अनेकविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे श्रावण पौर्णिमेला येणारा रक्षाबंधन.

भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण सुरू झाला की, वेध लागतात ते रक्षाबंधनाचे. रंगीबेरंगी राख्यांनी बाजार अगदी फुलून जातात. लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले भाऊ-बहीण परिस्थितीनुरूप एकमेकांपासून दूर असले तरी, लहानपणापासूनच्या आठवणी त्यांनी हृदयातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात.

यंदाच्या वर्षी रविवार, २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आणि आनंदात साजरा झाला, श्रावण पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा संबोधले जाते. नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. तिच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. रविवारी रक्षाबंधन हा सण उत्साहात पार पडला. यावेळी नेहा कक्करने रक्षाबंधनमध्ये किती ओवाळणी मिळाली? याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करते.

एवढंच नव्हे नेहाने आपल्या ओवाळणीत मिळालेल्या रक्कमेपेक्षा भावाला टोनी कक्कर ला अधिक रक्कम दिली आहे. नेहा कक्कर ने हल्लीच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नेहाने आपल्याला रक्षाबंधनमध्ये किती ओवाळणी दिली याचा खुलासा केला आहे. तिने फोटो शेअर करताना म्हटलंय की, टोनी कक्कडने यावेळी नेहाला चक्क एक रुपये ओवाळणी दिली आहे.

नेहाने पण उशिर न करता टोनीला चक्क 2 रुपये दिले. याचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावर नेहा पोस्टमध्ये म्हणते की, मी तुझ्यावर दुप्पट प्रेम करते. दोन रुपयांची फॅन्सी राखी खरेदी करा. नेहाचे सुंदर फोटो हल्लीच नेहाने सफेद रंगाचे फोटो शेअर केले आहेत. या आऊटफिटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

या फोटोत नेहा परीपेक्षा कमी दिसत नाही. मोकळे कुरळे केस, लांब कानातले, नाकात छान नोझरिंग आणि चेहऱ्यावरचा आनंद… नेहा कक्करच्या या फोटोने सोशल मीडियवर धुमाकूळ घातला आहे. अलीकडच्या काळात नेहा कक्कड माध्यमांपासून अंतर ठेवत आहे. तिने इंडियन आयडॉल शो मधूनच सोडला. त्यानंतर तिची बहीण सोनू कक्करने जज म्हणून शो पुढे नेला.

Team Hou De Viral