अखेर नेहाने यशसमोर दिली प्रेमाची कबुली, आता पुढे काय होणार?

अखेर नेहाने यशसमोर दिली प्रेमाची कबुली, आता पुढे काय होणार?

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये आता नेहा आणि यश यांचे नाते हे वेगळ्या वळणावर येण्याची शक्यता आहे. कारण आता लवकरच नेहा ही यशला जे वाटते ते सांगणार असल्याची शक्यता निर्माण झालेली आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

सध्या टेलिव्हिजनवर आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार, देव माणूस यासारख्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मात्र या मालिका जुन्या झाल्या आहेत आणि त्या कंटाळवाण्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता ‘माझी तुझी रेशमगाठ’ या मालिकेकडे प्रेक्षकवर्ग बऱ्याच प्रमाणात वळला आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे हा दिसत आहे. श्रेयस तळपदे याने या मालिकेमध्ये यशची भूमिका साकारली आहे. तर नेहाच्या भूमिकेत आपल्याला प्रार्थना बेहेरे ही अभिनेत्री दिसली आहे. श्रेयस तळपदे हा अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर दिसलेला आहे. श्रेयस तळपदे याने खूप वर्षांपूर्वी आभाळमाया या मालिकेत काम केले होते.

त्यानंतर त्याला बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपटांच्या चांगल्या ऑफर मिळाल्या. त्यामुळे त्याने आपला मोर्चा तिकडे वळवला. हिंदी मध्ये देखील त्यांची कारकीर्द यशस्वी झालेली आहे. एक्बाल सारख्या चित्रपटात त्याने जबरदस्त काम केले. त्यानंतर त्याने शाहरुख खान सोबत ओम शांती ओम या चित्रपटातही जबरदस्तरित्या काम केले होते.

या चित्रपटात त्याने शाहरुखच्या मित्राची भूमिका साकारली. त्यानंतर रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीज मध्ये देखील आपल्याला श्रेयस तळपदे पाहायला मिळाला. श्रेयस तळपदे याच्याकडे आणखी काही चित्रपट आगामी काळात असल्याचे सांगण्यात येते. प्रार्थना बेहेरे अनेक मालिका आणि चित्रपटात काही काम केलेले आहे.

प्रार्थना बेहेरेचे देखील लग्न झाले असून ती तिच्या सुखी आयुष्यात रममाण आहे. मात्र, असे असले तरी मालिकेमध्ये आता ती आपल्या प्रेमाची कबुली देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण मालिकेत यश आणि समीर यांनी प्लॅन असा आखलेला आहे की, आता नेहा हिच्यापुढे काही पर्याय उरलेला नाही.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये जेसिकाची एन्ट्री झाली आहे. जेसिकाच्या एन्ट्रीने नेहा हिला असुरक्षित वाटत आहे. नेहा हिचे यशवर प्रेम आहे. मात्र, ती कबुली देत नाही. त्यामुळे समीर आणि यश हे दोघे मिळून एक प्लॅन तयार करतात. त्यानुसार जेसीका ही यशची पूर्व प्रेयसी असल्याचे तिला सांगतात.

त्यामुळे नेहाच्या मनात खूप चलबिचल सुरू झालेली आहे. त्यामुळे लवकरच नेहा आपल्या प्रेमाची कबुली यशजवळ देणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी हा भाग दाखवण्यात येणार आहे, तर आपण माझी तुम्ही रेशीमगाठ मालिका पाहता का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा..

Team Hou De Viral