नेहा कक्कर ‘गरोदर’ नाही, परंतु हा खोटारडेपणा कशासाठी; जाणून घ्या

गायिका नेहा कक्करने शुक्रवारी नवरा रोहनप्रीत सिंहसोबत बेबी बंप दाखवत एक फोटो शेअर केला. फोटो पाहताच चाहत्यांमध्ये नेहा गरोदर असल्याची चर्चा रंगली. लग्नाला अवघे दोन महिने झाले असताना नेहा कक्कर गरोदर असल्याच समोर आलं. मात्र आता नेहाने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
नेहाने आपण गरोदर असल्याची नाही तर नव्या गाण्याची घोषणा केल्याचं समजतंय. नेहाने इंस्टाग्रामवर नवरा रोहनप्रीत सिंह सोबतचा ‘तोच’ फोटो शेअर केला आहे. या फोटोतून तिने नव्या गाण्याची घोषणा केली आहे. ‘खयाल रख्या कर’ म्हणत तिने चर्चा थांबवली आहे.
२२ डिसेंबर रोजी लाँच होणाऱ्या ‘खयाल रख्या कर’ गाण्याची घोषणा केली आहे. ही माहिती देताना नेहा रोहनप्रीत सिंहसोबत दिसत असून आपले Baby Bump फ्लाँट करत आहे. या फोटोत साऱ्यांच लक्ष नेहाच्या पोटोकडेच गेलं आणि नेहा कक्कर गरोदर असल्याची चर्चा रंगली.
नेहाने शुक्रवारी शेअर केलेल्या फोटोत कुठेही आपण गरोदर असल्याचं म्हटलं नव्हतं. ‘खयाल रख्या कर’ अशी पोस्ट टाकत तिने हा फोटो शेअर केलेला. यावर रोहनप्रीत सिंहने ‘अब तो कुछ ज्यादा ही खयाल रखना पडेगा नेहू….’ अशी कमेंट केली होती. यामुळे सगळ्यांचा गोंधळ झाला.