‘तारक मेहता ..’ मध्ये दिसणार नवीन ‘अंजली’ भाभी, दिसायला आहे जुन्या अंजली भाभी पेक्षाही खूप सुंदर

लॉकडाउननंतर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ची शूटिंग ही सुरू झाली, परंतु या कार्यक्रमाशी संबंधित अशा बातम्या सतत समोर येत आहेत, ज्यामुळे चाहते नाराज होत आहेत. गुरचरण सिंगने या शोला निरोप दिल्यानंतर आता अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहतानेही हा कार्यक्रम सोडल्याचे वृत्त येत आहे. फक्त एवढेच नव्हे तर बातमीनुसार निर्मात्यांनी शोसाठी एक नवीन अंजली मेहतासुद्धा सापडली आहे.
तारक मेहताला मिळणार नवीन अंजली ?
एका वृत्तानुसार, टीव्ही अभिनेत्री सुनैना फौजदार ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधल्या अंजलीची जागा घेणार आहे. रविवारपासून ती या शोचे शूटिंग सुरू करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत.
गेल्या 12 वर्षांपासून अंजलीच्या रुपात प्रेक्षकांच्या हृदयात आपली जागा निर्माण करणारी नेहा आता हा कार्यक्रम सोडून जात आहे हे सगळ्या प्रेक्षकांसाठी वाईट वाटणार आहे. चाहते सोशल मीडियावर आपली नाराजी व निराशा व्यक्त करीत आहेत. परंतु नेहाने 12 वर्षांपासून काम करत असलेल्या या शोमधून वेगळे होण्याचे का ठरविले, हे आतापर्यंत निर्मात्यांना सांगण्यात आले नाही.
तसे, जर आपण सुनैना फौजदार बद्दल बोललो तर ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे जिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू ही दाखवलेली आहे. लेफ्ट राईट लेफ्ट ते बेलनवाली बहु अश्या अनेक मालिकांमध्ये तिनी काम केले आहे. आता अंजलीच्या भूमिकेत ती किती वेळात फिट होते हे आपल्याला पुढे समजेलच.
सोढि च्या जागेवर देखील नवीन व्यक्ती दिसणार
त्याचबरोबर मालिकांमध्ये सोढि म्हणून सर्वांना परिचित असलेले गुरचरण सिंगनेही हा कार्यक्रम सोडला आहे. बलविंदरसिंग सूरी याने त्याची जागा घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. ही दुसरी वेळ आहे जेव्हा गुरचरण सिंगने हा शो सोडला आहे.
काही वर्षांपूर्वीही त्याने या कार्यक्रमातून स्वत: ला दूर केले. पण नंतर निर्मात्यांनी त्याची मनापासून समजूत काढल्यानंतर तो परत आला होता. पण यावेळी त्याला परत आणणे कठीण झाले आहे.
इतर बातम्यांसाठी आत्ताच पेज लाईक करा.