‘लग्नाची बेडी’ मालिकेत होणार एका गोंडस बालकलाकाराची ‘एन्ट्री’, आहे ती एक ‘मॉडेल’

‘लग्नाची बेडी’ मालिकेत होणार एका गोंडस बालकलाकाराची ‘एन्ट्री’, आहे ती एक ‘मॉडेल’

स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या अनेक मालिका सुरू आहेत. मात्र, या मालिकांमध्ये सध्या लग्नाची बेडी ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे.

ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. या मालिकेला आता वेगळा प्रेक्षक वर्ग देखील मिळताना दिसत आहे, तर मालिकामध्ये बालकलाकार घेणे हे आता नित्याचेच झाले आहे असे म्हणावे लागेल. कारण अनेक मालिकांमध्ये बालकलाकार हे आता पाहायला मिळत आहेत, तर आता लग्नाची बेडी या मालिकेतही एक बालकलाकार दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये देखील आपल्याला एक बालकलाकार दिसली. या बालकलाकाराचे नाव मायरा बायकूळ असे आहे, तर मायरा हिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे, तर गेल्या काही दिवसांमध्ये रंग माझा वेगळा या मालिकेतही काही बालकलाकार दिसले. आता लग्नाची बेडी या मालिकेत देखील वेगळे वळण येणार आहे.

लग्नाची बेडी या मालिकेत सिंधू ही भूमिका सध्या प्रचंड गाजत आहे. सिंधूची भूमिका अभिनेत्री सायली देवधर हिने साकारली आहे. सायली ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे तर संकेत पाठक देखील आपल्याला या मालिकेत दिसला आहे. त्याने देखील अतिशय उत्कृष्ट असे काम मालिकेत केले आहे, तर इतरांच्या भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडतांना दिसत आहेत.

छोट्या पडद्यावरील लग्नाची बेडी ही मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील सगळ्यात भूमिका या प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. आता या मालिकेमध्ये एका बालकलाकाराची एन्ट्री होणार आहे. मालिकेमध्ये आता सिंधू हिने राखी बाबतचे सत्य हे सर्वांसमोर आणले आहे. तसेच राखी हिला एक मुलगी असल्याचेही तिने राघव याला सांगितले आहे.

तर आता राखीच्या मुलीची भूमिका कुठली बालकलाकार साकारणार आहे याबद्दल अनेकांना उत्सुकता होती, तर आपण जाणून घेऊया की ही बालकलाकार नेमकी कोण आहे ती. ही बालकलाकार तनिष्का म्हडसे ही बालकलाकार राखीच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. तनिष्का ही बालकलाकार आणि मॉडेल देखील आहे.

याआधी अनेक मालिका आणि चित्रपटातही ती दिसली आहे. या मालिकेमध्ये तनिष्का ही राखीची मुलगी अन्वी ही भूमिका साकारणार आहे.

Team Hou De Viral