नाइट शिफ्टमध्ये काम करणे किंवा सतत शिफ्ट बदलल्याने ‘या’ गंभीर आजाराचा धोका!

नाइट शिफ्टमध्ये काम करणे किंवा सतत शिफ्ट बदलल्याने ‘या’ गंभीर आजाराचा धोका!

खाजगी कंपन्यांमध्ये २४ तास काम करण्याचं चलन आता अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नाइट शिफ्टमध्ये काम करावं लागतं किंवा दर आठवड्याला त्यांच्या शिफ्ट आणि शेड्यूलमध्ये बदल होत राहतो. म्हणजे कधी मॉर्निंग शिफ्ट तर कधी नाइट. तुम्ही जर अशाच शेड्यूलमध्ये काम करत असाल तर याने तुम्हाला केवळ लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका अधिक आहे, असे नाही तर बदलत्या शिफ्टमुळे तुम्ही मानसिक रूग्णही होऊ शकता.

झोपेत अडसर येत असल्याने तणाव

newtelegraphng.com ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले आहे की, असं शेड्यूल असणारे असे लोक ज्यांच्या झोपेत अडसर निर्माण होतो, त्यांना डिप्रेशन आणि स्ट्रेसची समस्या ९ ते ५ दरम्यान काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत अधिक असते. त्यासोबतच शिफ्टमध्ये काम करणारे लोक मानसिक समस्यांनी ग्रस्त होण्याची शक्यताही २८ टक्के अधिक असते. हा निष्कर्ष ७ रिसर्चमध्ये सहभागी २८ हजार ४३८ लोकांची टेस्ट केल्यावर समोर आला.

शिफ्ट बदलल्याने काय होतं?

ब्रिटनच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासकांनी केलेल्या या रिसर्चमधून समोर आले आहे की, नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या किंवा सतत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना डिप्रेशनची समस्या ३३ टक्के अधिक होती. रिसर्चशी संबंधित तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पुन्हा- पुन्हा शिफ्टमध्ये बदल होत असल्याने आपल्या झोपण्याच्या आणि झोपेतून उठण्याच्या सवयीवर प्रभाव पडतो.

आपलं शरीर झोपण्या-जागण्याच्या सवयीत सतत होणाऱ्या बदलाला सहन करू शकत नाही. ज्यामुळे लोकांमध्ये चिडचिड वाढते. तसेच मूड स्विंग होणे आणि समाजापासून वेगळं राहण्याचंही कारण ठरते. याने परिवार आणि मैत्रीची नातीही प्रभावित होतात.

काय करावे?

अभ्यासकांनी रिसर्चमध्ये असंही सांगितलं आहे की, व्यायामासाठी नियमित वेळ काढणे, दिवसाच्या उजेडात बाहेर जाणे आणि परिवार व मित्रांसोबत वेळ घालवून मानसिक आरोग्य चांगलं ठेवता येऊ शकतं. तुम्हाला आवडतात त्या गोष्टींसाठी वेळ द्या त्याने तुम्हाला चांगलं वाटेल.

Team Hou De Viral