ह्या अभिनेत्रीने नवऱ्याची बेडरूममधली एक सवय केली उघड; म्हणाली, ” सकाळी उठल्यावर तो माझ्या…”

ह्या अभिनेत्रीने नवऱ्याची बेडरूममधली एक सवय केली उघड; म्हणाली, ” सकाळी उठल्यावर तो माझ्या…”

बॉलिवूडमधील सर्वांत चर्चित आणि यशस्वी अभिनेत्रीपैकी एक म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांका ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने आपल्या परिश्रमांच्या जोरावर हे स्थान मिळविले आहे. जिथे प्रत्येकजण पोहोचण्याच्या प्रयत्नात असतो. विद्याने तिच्या फिल्मी करिअरमध्ये खूप मेहनत घेतली आहे आणि मेहनतीच्या जोरावर तिने बोललीवूडमध्येच नाही तर चक्क हॉलिवूड मध्ये देखील स्वतः चे नाव कमावले.

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ही जोडी १ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकली. प्रियांका आणि निक ह्यांच्या लग्नाला जवळपास २ वर्षे होऊन गेले. प्रियंका आणि निकची जोडी खूपच गोंडस आहे. दोघही एकत्र खूप आनंदी आहेत. लोकांनाही प्रियंका आणि निकची ही जोडी खूप आवडते. दोघेही अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. या जोडीची फॅन फॉलोइंग संपूर्ण जगात आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची २०१७ मध्ये अमेरिकेत एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली आणि काही महिन्यांनंतर त्यांचे लग्न झाले. प्रियांका आणि निकचे लग्न संपूर्ण हिंदुस्थानी रीती-रिवाजांनी राजस्थानच्या जोधपूरमध्ये झाले होते.

प्रियांका आणि निकच्या डेटिंगची चर्चा बर्‍याच काळापासून सुरू होती. काही लोकांनी अफेयरची अफवा म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. पण २०१७ मध्ये जेव्हा दोघे मेट गालाच्या रेड कार्पेटवर एकत्र आले होते तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरेत त्यांची जोडी आली होती.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास त्यांच्या कामात खूप व्यस्त आहेत पण तरीही हे जोडप्या अधिकाधिक वेळ एकत्र घालवण्याचा प्रयत्न करतात. या वर्षभरात कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये निक आणि प्रियांका एकमेकांसोबत आहेत आणि त्यांनी एकमेकांना खूप वेळ दिला आहे.

एका मुलाखतीत प्रियंका चोप्राने सांगितले होते की बेडरूममध्ये निक एक विचित्र काम करतो ज्यामुळे मला थोडी चीड येते. ती म्हणाली, “मी उठते तेव्हा निक माझा चेहरा पहात राहतो. मी म्हणते थांब मला थोडा मस्करा आणि मॉइश्चरायझर लावू दे कारण माझे डोळे सुजलेले दिसत आहेत… पण ते खूप गोड वाटते. आपल्या पतीनेही असे करावे अशी तुमची इच्छा असेलच पण ते थोडेसे विचित्र देखील वाटते. ‘

प्रियांका चोप्रा अखेरिस ‘द स्काई इज पिंक’ मध्ये दिसली होती. लवकरच प्रियांका राजकुमार रावसोबत ‘द व्हाइट टायगर’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यानंतर तिने कोणत्याही बॉलिवूड प्रोजेक्टवर सही केलेली नाही. तथापि, हॉलिवूड चित्रपटांच्या बाबतीत, ती लवकरच किआनू रीव्हजसह प्रसिद्ध मालिका ‘मॅट्रिक्स’ च्या चौथ्या पर्वात दिसणार आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral