‘बिगबॉस मराठी’ च्या घराबाहेर पडतात ‘निखिल’ चा बिगबॉस च्या घरात चालणाऱ्या ‘कांडा’ बद्दल धक्कादायक खुलासा

‘बिगबॉस मराठी’ च्या घराबाहेर पडतात ‘निखिल’ चा बिगबॉस च्या घरात चालणाऱ्या ‘कांडा’ बद्दल धक्कादायक खुलासा

कलर्स मराठी या वाहिनीवर दोन ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या बिग बॉस ने आता रंगत घेतली आहे. गेल्या काही दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये जोरदार हाणामाऱ्या, भांडणं होत असल्याचे आपण पाहत आहोत. या शोमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना आपणच बिग बॉस होणार असे वाटायला लागले आहे.

मात्र, यामध्ये जो कोणी चांगला खेळ करेल, तो आपल्याला बिग बॉस झाल्याचे पाहायला मिळणार आहे, तर बिग बॉस या चारचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करत आहेत. गेल्या तीन सत्रा मध्ये महेश मांजरेकर यांनीच या शोचे सूत्रसंचालन केले आहे.

आता चौथ्या पर्वा मध्ये देखील महेश मांजरेकर हेच या शोचे सूत्रसंचालन करत असून आपल्या जबरदस्त अशा शैलीने ते सहभागी झालेल्या स्पर्धकांचे मन जिंकून घेत आहेत. त्याचप्रमाणे प्रेक्षकांचेही ते मन जिंकत आहेत. आता बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन होणार असल्याचे कळत आहे. यामध्ये काही स्पर्धकांची नावे देखील समोर आले आहेत.

मराठी बिग बॉस मध्ये या आठवड्यात आपण अमृता देशमुख, निखिल राजशिर्के अमृता धोंगडे, रोहित शिंदे, विकास सावंत, रुचिरा जाधव, योगेश जाधव आणि अक्षय केळकर नॉमिनेट झाले होते. यातून निखिल राज शिर्के हा घराच्या बाहेर पडला आहे. निखिल राज शिर्के हा घराच्या बाहेर पडल्यानंतर अनेकांनी याबाबत आपले मत व्यक्त केले होते.

त्यामुळे आता निखिल काय बोलणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले होते. निखिल याने आपले नुकतेच मत व्यक्त केले आहे.बिग बॉसच्या घरामध्ये निखिल याचा काही जणांशी वाद देखील झाला होता. मात्र, कालांतराने हा वाद संपुष्टात देखील आला होता. आता निखिल याच्या जाण्याने काही कलाकार हे दुःखी देखील झाले आहेत.

याबाबत त्याने आपले मत देखील व्यक्त केले होते. आता निखिल याने देखील आपले मत व्यक्त करून आपल्या मनातील खदखद बाहेर काढली आहे. एक प्रकारे त्याने आपले हे मत व्यक्त केले आहे, असे म्हणावे लागेल. निखिल हा म्हणाला की, बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाल्यानंतर मला जो आनंद मिळाला तो वाखण्याजोगा होता.

या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर मला खूप काही शिकायला मिळाले. महेश मांजरेकर सरांनी मला खूप प्रोत्साहन दिले. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मला सगळं काही मिळालं. या शो मधून मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. पुढे देखील त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल, अशी अपेक्षा निखिल याने व्यक्त केली आहे.

Team Hou De Viral