धक्कादायक ! लंडन च्या रस्त्यावर एकमेकांच्या जीवावर उठले हे लोकप्रिय कलाकार

धक्कादायक ! लंडन च्या रस्त्यावर एकमेकांच्या जीवावर उठले हे लोकप्रिय कलाकार

गेल्या काही वर्षात टेलिव्हिजनवर कॉमेडी शो खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. वेगवेगळ्या वाहिन्यांवर हे शो सुरू असतात. “चला येऊ द्या”, “महाराष्ट्राची हास्य जत्रा” हे आणि इतर शो गेल्या अनेक वर्षापासून सुरू झालेले आहेत.

मात्र, यामध्ये सगळ्यात पुढे “चला हवा येऊ द्या” हा शो आहे. कारण या मधील कलाकार हे जीव तोडून अभिनय करत असतात आणि त्यामुळेच त्यांचा “चला हवा येऊ द्या” हा शो प्रचंड चालत असतो. या शोमधील डॉ. निलेश साबळे हे प्रमुख सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत. तर यामध्ये कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे इतर कलाकार हे अतिशय जबरदस्त असे काम करत असतात.

श्रेया बुगडे हिचे कौतुक तर अनेकांनी केलेले आहे. श्रेया बुगडे हिने काही चित्रपटातही याआधी काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती चला हवा येऊ द्या” या शोचा माध्यमातूनच. या शोमध्ये डॉक्टर निलेश साबळे हे देखील अफलातून असे काम करत असतात.

हिंदी वाहिन्यांवर देखील गेल्या काही वर्षांमध्ये कॉमेडी शोचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो. या शोच्या माध्यमातून टीआरपी खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतो. त्यामुळेच असे शो सुरू करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सुद्धा तुफान गाजत आहे. या शोमध्ये सगळेच कलाकार हे तुफानरित्या कॉमेडी करत आहेत.

तर या शोमध्ये सध्या गौरव मोरे हा कलाकार सहभागी झाला आहे. या शोमध्ये त्याला वेगळ्या अर्थाने ओळख मिळाली आहे. गौरव मोरे याने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून मराठी मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण केले होते. या मालिकेमध्ये त्याची अतिशय विनोदी भूमिका होती. त्याचीही भूमिका देखील लोकप्रिय ठरली होती.

मात्र, त्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमुळेच ओळख मिळाली. आता गौरव मोरे याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. लंडनच्या रस्त्यावर गौरव मोरे हा प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत वाद घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेता निखिल चव्हाण याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

एका चित्रपटाच चित्रीकरण सुरू असून यादरम्यानच्या सर्वांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. आता नेमका काय वाद झाले हे मात्र कळले नाही.

Team Hou De Viral