मोठी अपडेट ! अखेर हा पहिला स्पर्धक पडला ‘बिगबॉस मराठी 4’ च्या घराबाहेर

मोठी अपडेट ! अखेर हा पहिला स्पर्धक पडला ‘बिगबॉस मराठी 4’ च्या घराबाहेर

कलर्स मराठी वर सुरू असलेल्या मराठी बिग बॉस या शोमध्ये आता रंगत चढत चालली आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये सगळेजण सेलिब्रेटी असल्याचे आपण पाहिले आहे.

या शोमध्ये महेश मांजरेकर हेच सूत्रसंचालन करत आहेत गेल्या तीन शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनीच केले होते. यासाठी सिद्धार्थ जाधव याचे नाव आघाडीवर आले होते. मात्र, नंतर महेश मांजरेकर हेच या शोच सूत्रसंचालन करणार हे ठरले आणि महेश मांजरेकर आता याविषयी सूत्रसंचालन करत आहेत.

गेल्या चावडीमध्ये महेश मांजरेकर यांनी सहभागी झालेल्या स्पर्धकांना चांगले झापून काढले होते. यामध्ये अमृता देशमुख यांना महेश मांजरेकर यांनी तू वकील आहेस का? वकील बनू नकोस, असे म्हणून झापून काढले होते. त्याचप्रमाणे इतरांनाही त्यांनी चांगले सुनावले होते.

बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये यावेळेस अनेक कलाकार हे सहभागी झाले. यामध्ये निखिल राजशिर्के, प्रसाद जवादे, विकास सावंत, किरण माने, तेजस्विनी लोणारे, यशश्री मसुरेकर, रुचिरा जाधव, समृद्धी जाधव, योगेश, रोहित शिंदे यांच्यासह अमृता देशमुख ही देखील या शोमध्ये सहभागी झाली आहे. अमृतास देशमुखच्या बाबतीतला एक व्हिडिओ काही दिवसापूर्वी प्रचंड व्हायरल झाला.

बाथरूममध्ये कपडे बदलताना तिची लोवर ही घसरली आणि त्यानंतर कॅमेरा मध्ये हे दृश्य कैद झाले होते. त्यानंतर अमृता देशमुख हिने बिग बॉस कडे विनंती केली आणि हे दृश्य कुणालाही दाखवू नये असे सांगितले. त्यानंतर हे दृश्य हटवण्यात आले होते. मध्यंतरी किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये देखील प्रचंड वाद झाल्याचे आपण पाहिले.

अपूर्वा हिने किरण माने यांना अरे तुरे बोलले होते. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच पेटले होते. आता बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन साठी आठ कलाकारांची नावे समोर आली होती. त्यानंतर आता एक कलाकार या घराच्या बाहेर पडला आहे. मध्यंतरी विकास सावंत आणि योगेश यांचा खेळ अजिबात होत नव्हता.

त्यामुळे महेश मांजरेकर यांनी त्यांना चांगले सुनावले होते. त्यानंतर या दोघांनी कॅप्टनसीसाठी आपला आपला चांगला खेळ दाखवला होता. मात्र आता बिग बॉसच्या घरामधून एक सदस्य बाहेर पडला आहे. या कलाकाराचे नाव निखिल राज शिर्के असे आहे. निखिल राज शिर्के हा या घराच्या बाहेर पडला आहे. तो घराच्या बाहेर पडल्यानंतर अनेकांना वाईट वाटले होते.

मात्र, या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे कलाकारांना बाहेर पडावे लागते. आता निखिल बाहेर पडला आहे. त्यामुळे पुढचा नंबर कोणाचा लागतो हे पाहावे लागेल. निखिल याला आपण माझी तुझी रेशीमगाठ, दे धमाल, नायक, आभाळमाया, अरुंधती, लगोरी, एक मोहर अघोर, अजूनही बरसात आहे यासारख्या मालिकांमध्ये काम करताना पाहिले आहे.

तर निखिल याची आपली आवडती मालिका कुठली आहे, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बिग बॉस मधून तो घराच्या बाहेर पडला आहे, त्याबद्दल आपले काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral