‘चला हवा येऊ द्या’ बाबत निलेश साबळे केला धक्कादायक खुलासा, खोटं हसण्यासाठी पैसे…

‘चला हवा येऊ द्या’ बाबत निलेश साबळे केला धक्कादायक खुलासा, खोटं हसण्यासाठी पैसे…

दूरचित्रवाणीवर गेल्या अनेक वर्षापासून मनोरंजनात्मक कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपला जम बसवत आहेत. काही वर्षांपूर्वी झी मराठीवर घडलंय बिघडलंय ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत जितेंद्र जोशी यांनी अतिशय दर्जेदार काम करून सर्वांचे मनोरंजन केले होते.

तसेच गेल्या काही वर्षात कॉमेडी शो देखील मोठ्या प्रमाणात विविध वाहिनीवर सुरू असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यातील काही कार्यक्रमांना यश मिळते आहे. गेल्या काही वर्षापासून चला हवा येऊ द्या ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील कलाकार अतिशय आपलातुन काम करत असल्याने प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर घेतले आहे.

त्यामुळेच या मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस वाढताना दिसतो. डॉक्टर निलेश साबळे हे या मालिकेचे सूत्रधार असून ते अनेक भागांमध्ये स्वतः सूत्रसंचालन करून कलाकारांना बोलते करतात. डॉक्टर निलेश साबळे हे देखील एक उत्तम कलाकार आहेत.

ते चला हवा येऊ द्याच्या एका एपिसोडसाठी ते तब्बल १ लाख २५ हजार रुपये मानधन घेत असल्याचे समोर आले आहे. सागर कारंडे हा अफलातून टायमिंग असणारा हा अभिनेता सर्वांनाच प्रचंड आवडतो. त्यांनी साकारलेला रामदास आठवले तर सर्वांना अतिशय भावून जातो. चला हवा येऊ द्याच्या एका भागासाठी सागर हा तब्बल ७० हजार रुपये मानधन घेतो.

श्रेया बुगडे ही मराठीतील अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री असून चला हवा येऊ द्या या मालिकेत विविध पात्र साकारते. तिच्या हजरजबाबीपणाची सर्वांनी दखल घेतली आहे. श्रेया एका एपिसोडसाठी तब्बल 80 हजार रुपये मानधन घेते. तर आता चला हवा येऊ द्या या शोबद्दल डॉक्टर निलेश साबळे यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

काही दिवसापूर्वी प्रेक्षकांनी त्यांना असा प्रश्न विचारला होता की, या शोमध्ये समोर बसलेले जज म्हणजे स्वप्निल जोशी आणि इतर जज तसेच समोर बसलेले प्रेक्षक हे मुद्दाम हसत असतात का? की ते खरोखरच हसत असतात, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर निलेश साबळे यांनी शपथ घेऊन सांगितले की, आम्ही प्रेक्षकांना किंवा जजला हसवण्यासाठी असे वेगळे काही करत नाही.

त्यांना आम्ही मुद्दामून हसायला लावत नाहीत. ते उत्स्फूर्तपणे हसत असतात. त्यामुळे आपल्याला मी खात्री देतो की, आम्ही जे कला सादर करतो, त्यानुसारच हे जज हसत असतात. त्यांना हसण्यासाठी वेगळे काही सांगावं लागत नाही, असे निलेश साबळे यांनी स्पष्ट केले आहे.

Team Hou De Viral